गॉसिप कल्ला - १५०० रुपयांत संजय दत्तच्या घरी काम करायचा हा अभिनेता
News24सह्याद्री - १५०० रुपयांत संजय दत्तच्या घरी काम करायचा हा अभिनेता... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. बर्थडे गर्ल तेजस्विनी पंडित चा स्पेशल दिवस
अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तेजस्विनी वेळोवेळी ट्रोलर्सना रोकठोक उत्तर देत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीतने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तेजस्विनी आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करतेय.
2. फिटनेसच्या बाबतीत मंदिरा बेदी भल्याभल्यांना देते टक्कर
कलाकार मंडळींचं शेड्युअल खूप बिझी असतं. त्यातूनही ते वर्कआऊटसाठी वेळ काढत नित्यनियमाने व्यायाम करतात. कलाकारांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असतं. त्यामुळे काही कलाकार फिट राहण्यासाठी वर्कआऊट करत जिममध्ये घाम गाळतात. तर काही कलाकार विविध योगासनं करतात. फिटनेसबाबत सजग असलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी.
3. १५०० रुपयांत संजय दत्तच्या घरी काम करायचा हा अभिनेता
झगमगत्या दुनियेत काम करणाऱ्या कलाकारांना पदार्पण करण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कष्टाने आणि कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. असाच एक बॉलिवूडमधील अभिनेता ज्याने अभिनेता संजय दत्तच्या घरी महिना १५०० रुपये पगारावर काम केले आहे. हे अभिनेते म्हणजे शक्ती कपूर.शक्ती कपूर यांनी १९७२ साली रिलीज झालेला चित्रपट जानवर और इन्सानमधून बॉलिवूडमधील करिअरची सुरूवात केली होती.
4. एका कारणामुळे कधीच मीडियासमोर येत नाही आदित्य चोप्रा
आदित्य चोप्रा यांना लाईमलाइटमध्ये राहणे अजिबात आवडत नाही.दिवंगत यश चोप्रा यांचा आदित्य चोप्रा मोठा मुलगा आहे. वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. तर त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी अजरामर ठरलेल्या 'दिलवाल्या दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाचे दिग्दर्शन केले.अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देऊनही, आदित्य कधीच मीडियाच्या कॅमेरा समोर येत नाही. आदित्यचे मीडियाला कधीच सामोरे न जाण्यास एक कारण आहे.
5. शन्मुखला हाकला
काल प्रसारित झालेल्या 'इंडियन आयडल 12'च्या एपिसोडवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. कालच्या या एपिसोडला रूपकुमार राठोड, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल असे दिग्गज स्पेशल गेस्ट म्हणून लाभले. या एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. साहजिकच नदीम-श्रवण या गोडजोळीची अनेक रोमॅन्टिक गाणी शोमध्ये सादर केली गेलीत. पण यादरम्यान शन्मुखप्रियाचा परफॉर्मन्स बघून पुन्हा एकदा चाहते संतापले.
No comments
Post a Comment