गॉसिप कल्ला - सिद्धार्थ जाधवची भन्नाट बॅटिंग पुन्हा व्हॉयरल
News24सह्याद्री - सिद्धार्थ जाधवची भन्नाट बॅटिंग पुन्हा व्हॉयरल... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. कोरियोग्राफर गीता कपूरने गुपचूप बांधली लग्नगाठ?
छोट्या पडद्यावर गीता मां या नावाने प्रसिध्द असलेली कोरियोग्राफर गीता कपूर सध्या 'सुपर डान्सर चॅप्टर-4' मध्ये दिसतेय. तूर्तास गीता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, तिचे काही फोटो तुफत्तन व्हायरल होत आहेत. या फोटोनंतर गीताने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.शेअर केलेल्या फोटोत गीताने लाल रंगाचा अनारकी सूट घातला आहे आणि आश्चर्य म्हणजे तिच्या भांगात कुंकू आहे.
2. इच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट,
बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता तो कोरोनामुक्त झाला आहे. त्यानंतर त्याने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची इच्छा असूनही तो प्लाझ्मा डोनेट करू शकला नाही. त्याला हॉस्पिटलमधून घरी परत पाठवण्यात आले.
हॉस्पिटलने नकार दिल्यामुळे माघारी फिरावे लागले.
3. Indian Idol 12:मधील दानिश व शन्मुखप्रियाला शोमधून बाहेर काढा !*
गेल्या काही दिवसांत 'इंडियन आयडल 12' या सिंगींग रिअॅलिटी शोने अनेक वाद ओढवून घेतलेत . अलीकडे 'किशोर कुमार स्पेशल एपिसोड' या शोवर बरीच टीका झाली. आता या शोच्या दोन स्पर्धकांना शोमधून बाहेर करा, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. हे दोन स्पर्धक कोण तर मोहम्मद दानिश आणि शन्मुख प्रिया... होय, दानिश व शन्मुख यांच्यामुळे 'इंडियन आयडल 12'ने नवा वाद ओढवून घेतला आहे.आता या दोघांनी काय केले,.? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे कारण आहे.
4. 'मी पृथ्वी कन्या' म्हणत, श्रिया पिळगावकरने शेअर केले फोटो
मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.श्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. श्रियाने तिचे लेटेस्ट फोटोशूटची इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
5. सिद्धार्थ जाधवची भन्नाट बॅटिंग पुन्हा व्हॉयरल
सीसीएल म्हणजेच 'सेलिब्रिटी क्रिकेट लीग' संपून काही दिवस झाले असले तरीही अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थने एक षटकार मारला होता. जो प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला होता. तर यामुळे अनेकांना धोनीच्या षटकाराची आठवण ही झाली होती.सीसीएलमधून वीर मराठी या संघातून सिद्धार्थ खेळत होता.
No comments
Post a Comment