Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - कोपरगावात २८ हजारांची लाच घेताना तलाठ्याला पकडले

No comments

News24सह्याद्री - कोपरगावात २८ हजारांची लाच घेताना तलाठ्याला पकडले....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


1. 43 हजार रूपाचे मेडिकल साहित्याचे वाटप
माणिकदौडी येथील प्राशासन आणि लोक लोकसहभागातून उघडलेले रत्न जैन विद्यालय येथील कोविड सेंटरला मढी देवस्थान च्या वतीने  पीपीटी किट हॅन्ड ग्लोज कॅप , मेडिसिन , व्हिटामिन च्या गोळ्या ,  अशा सुमारे 43 हजार रुपायचे मेडिसिन देण्यात आले  यावेळी पंचायत समिती पाथर्डी चे प्रशासकीय अधिकारी प्रशांत तोरवणे मढी देवस्थान चे अध्यक्ष संजय मरकड  ,राधकीसन मरकडं , देवस्थाने कर्मचारी बाबासाहेब मरकड वैद्यकीय अधिकारी रुपाली इंगळे ,सुभाष कुलकर्णी, तलाठी राजू मेरड समीर पठाण  बाळासाहेब तिडके  आधी मान्यवर उपस्थित होते.

२. पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांकडे शेवगाव नगरपरिषदेचे दुर्लक्ष असुन
मान्सून अगदी काही दिवसावर येऊन ठेपला असताना शहरातील ओढ्यातील अतिक्रमण हटवणे, ओढे-नाले स्वच्छ करणे पावसाळ्यापूर्वी या कामाचा विसर  नगर परिषद प्रशासनाला पडला असल्याची खंत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी व्यक्त केली. 

३. कोपरगावात 28 हजारांची लाच घेताना तलाठ्याला पकडले
कोपरगावात 28 हजारांची लाच घेताना तलाठी सुशील शुक्ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकचा पथकाने रंगेहात पकडले कोपरगाव तालुक्याचे नाव आजवर राजकारणात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात नावाजलेलं होतं मात्र आता वाळू तस्करी मध्येही हे नाव पुढे येत आहे माजी मंत्री तथा माजी खासदार शंकरराव काळे यांनी गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी उच्च न्यायालयातून स्थगिती अन्य आणली होती मात्र दुर्दैवानं स्थगिती उठल्याने वाळूचा उपसा जोरात सुरू होऊन तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.  

४. शेवगाव शहरात विनाकारण फिरणाऱ्याची कोरोना चाचणी
शेवगाव शहरात विनाकारण फिरणाऱ्याची कोरोना चाचणी.मास्क न वापरणारे आणि मोटर सायकलवर डबलसीट फिरणार्यावर कारवाई केली जात असून आंबेडकर चौक ते क्रांती चौक विनाकारण फिरणार्यावर आज पोलिसांनी धडक कारवाई केली.कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पोलीस आणि प्रशासन अधिक सक्रिय होताना दिसत आहे. 

५. शिर्डी मतदारसंघात केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण
शिर्डी मतदारसंघात केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल सेवा साप्ताहाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोविड संकटात सामाजिक बांधिलकीने केलेल्या कार्याचा सन्मानार्थ "कोविड योद्धा सन्मान लोणी येथील प्रवरा कोविड सेन्टर मध्ये सत्कार करताना भाजपचे जेष्ठ नेते आ राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,प स सभापती नंदा तांबे, ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, ऋषिकेश खर्डे, भाजपचे युवा मोर्चा चे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सतीश बावके सह सर्व भाजपचे पदाधिकारी ,ग्रामस्थ व आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

६. पोलिस स्टेशनच्या आवारात झुम्बा डान्ससही करण्यात आला
उच्च सर्वेक्षण आणि माजी  वसुंधरा अंतर्गत गेल्या आठ महिन्यापासून कर्जत शहरातील सर्व सामाजिक संघटना कर्जत शहराचे रूप पालटण्यासाठी झटत आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाने  सगळीकडे थैमान घालत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा विचार करून सर्व सामाजिक संघटनांच्या मंडळींनी कोविड  सेंटर वर जाऊन कोरोना पॉझिटिव रुग्णांची भीती घालवण्यासाठी योगा आणि संगीताच्या तालावर झुम्बा डान्स करत व्यायाम करण्याचे काम केले. 

७. मुळा पाटबंधारे खात्याच्या पाठ तार्‍या गेल्या चोरीला
नेवासा फाटा आणि परिसरातील वाटणाऱ्या मुळा पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे चोरीला गेलेल्या आहेत सारे असूनही तर दिसत नसल्यामुळे हरवलेल्या पाठ सार्या पाटबंधारे खात्याने शोधून दफन शेतीला आवर्तन देण्याची मागणी प्रवीण साळवे यांनी पाटबंधारे विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे पोर्टल वर दिली आहे

८. कोव्हीड सेंटरला साईभक्ताकडून २५०० किलो केशर आंबे देणगी
शिरूर तालुक्यातील एका शेतकर्याने आपल्या आंब्याच्या शेतीतील तब्बल २५०० किलो केशर आंबे साई संस्थानला देणगी म्हणून दिले. साईबाबा संस्थानच्या वतीने उभरण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसह, साईबाबा आणि साईनाथ रुग्णालयातील रुग्णांबरोबर परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रमांनाही साई संस्थानाकडून दररोज मोफत जेवण दिले जाते. 

९. गोदावरी नदीपात्रातून 24तास बेसुमार वाळू उपसा
श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्रातून लिलाव पेक्षा जास्त वाळू उपसा सुरू आहे हा लिलाव तातडीने बंद करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली या ठेकेदाराने गोदावरी नदी पात्रात अनधिकृतपणे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर सहाय्याने दररोज सुमारे तीनशे डंपर वाळू उपसा करत आहे. हा अनधिकृत वाळू उपसा श्रीरामपूर तहसीलदार प्रांताधिकारी, सर्कल, तलाठी, पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केले आहेत.

१०. श्रीरामपुरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात करोना रुग्णांची वाढती लोकसंख्या असूनही नागरिकामध्ये त्याचे गांभीर्य दिसून येत नाही. बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. येथे असलेल्या सर्वांकडून सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *