जिल्ह्याची खबरबात - पंतप्रधानांचा उद्या थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
News24सह्याद्री - पंतप्रधानांचा उद्या थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. पंतप्रधानांचा उद्या थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरूवारी २० मेला कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांचा संवाद होणार आहे.
2. बाभळेश्वर मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु
शिर्डी मतदारसंघातील लसीकरण मोहीमेत बाभळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बाभळेश्वर आणि तीसगाव येथील ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्री विखे पाटील, सरपंच सौ. विमल म्हस्के ,उपसरपंच अमृत मोकाशी,यांसहग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय.
3. बोधेगाव ग्रामस्थांची मागणी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी
शेवगाव तालूक्यातील बोधेगाव येथे लहान मोठे दहा ते बारा दवाखाने आहेत. परंतू रात्री दहानंतर एकही दवाखाना उघडा नसतो . रात्री कितीही आवाज दिला, बेल वाजवली, दरवाजा ठोठावला आणी कितीही मोठयाने ओरडले तरी दवाखाना उघडला जात नाही, त्यामुळे रुग्ण आणी त्यांच्या नातेवाईकांना शेवगावला जावे लागते. अनेक वेळा ह्नदय विकाराच्या रुग्णाला प्रथम उपचार न मिळाल्याने शेवगाव कडे जातांना रस्त्यातच अशा रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना या भागात घडल्या आहेत. येथाल अनेक डॉक्टरांची रुग्णालये असुन ते रूग्णालयाशेजारीच राहतात पण रात्री उठत नाहीत.
4. कोपरगाव नगरपालिकेच्या कोरोना आणि आरटीपीसीआर टेस्ट उपक्रम सुरु
कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने प्रभागनिहाय कोरोना आणि R. T. P. C. R. टेस्ट करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरवात प्रभाग क्रमांक एक पासून करण्यात आली. कोरोनाची रुग्ण संख्या दिवसांदिवस वाढत असून रुग्ण वाढीला आळा घालण्याकरिता नगरपालिकेने शहरातील नागरिकांना सह छोट्या व्यापारी पासून सर्वच दुकानदारांची कोरोना तपासणी सुरु केली असून नुकतीच भाजीपाला विक्रेते यांची तपासणी करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज नागरिकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
5. कोरोनावर मात करत पोलीस उपअधीक्षक संजय सातव कर्तव्यावर रुजू
राज्यातील कोरोनाबाधितांना बरे करण्याचे काम वैद्यकीय प्रशासन करत असून त्यांच्या सोबत महाराष्ट्र पोलीस सुद्धा काम करत आहेत. मात्र वैद्यकीय कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी सुद्धा या धावपळीमध्ये कोरोना पॉसिटिव्ह येत आहेत. मागील १५ ते २० दिवसापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी बाधित झाल्याने शिर्डीचे उपविभागीय अधिकारी संजय सातव हे देखील कोरोनाबाधित झाले होते.मात्र आता ते कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून आपल्या कर्तव्यावर पुन्हा रुजू झाले आहेत.
6. राहुरीत लहान मुलाच्या माध्यमातून दारूची विक्री
राहुरी परिसरातील एका हॉटेलमध्ये लहान मुलगा दारू विक्री करताना दिसल्यावर तहसीलदार शेख यांचा चांगलाच पारा चढला होता.पैसे कमवण्यासाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालायला तुम्हाला लाज कशी वाटतं नाही, असं म्हणत त्यांनी या हॉटेल मालकाला चांगलंच धारेवर धरलंय आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत.
7. मुलीसाठी पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न
नवरा बायकोचे एकमेकांसोबत भांडण होत असल्याने मुलगी आपल्या ताब्यात द्यावी या मागणीसाठी खांडगाव मधील गणेश गायकवाड याने संगमनेर सहारा पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोल ओतून घेत स्वतःलाच पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय.मात्र संगमनेर शहर पोलिसांनी समयसूचकता बाळगत त्याला हे कृत्य करण्यापासून रोखलं आहे. या प्रकरणी त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.
8. लसीकरणासाठी शिक्षकांनी केले अन्नत्याग
कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्यात प्राथमिक शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा, सर्वच शिक्षकांचे लसीकरण करा, या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन मंगळवारी करण्यात आलय. इतर अनेक जिल्ह्यात शिक्षकांनी प्राधान्याने दोन्ही डोसचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण केले. अहमदनगर जिल्हा प्रशासनानेच याबाबत उदासीनता का दाखवली. शिक्षकांना लस नाही तर मग काम तरी का दिले जाते ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
9. नगरपरिषद फंडातून रुग्णवाहिका खरेदी करण्याची मागणी
कोपरगाव शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहरातील गोरगरीब जनतेला याचा फटका बसत आहे. कोरोनाबाधित रुग्णाची ने आन करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्णवाहिका सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे कोपरागाव नगरपरिषदने फंडातून एक रुग्णवाहिका तातडीने खरेदी कराविअशी मागणी भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे केलीय.
१०. श्रीरामपूर पोलिसांनी गुटखा पकडला
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मधील काजी बाबा रोडवर कादर नावाच्या एका इसमाला गुटखा बाळगला म्हणून पोलिसांनी पकडलय. पोलिसांनी त्याच्याकडून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment