मोठी बातमी - हनीट्रॅप : हिंगणगावचा बापू सोनवणे गजाआड; फॉर्च्युनरही केली जप्त
News24सह्याद्री -
नगरमध्ये गाजलेल्या आणि कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल केेलेल्या प्रकरणात तालुका पोलिसांनी बापू सोनवणे यास अटक केली आहे. हिंगणगाव येथील रहिवाशी असणारा बापू सोनवणे याने महिलेला खंडणी वसुल करण्यात भूमिका बजावली होती. नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. बापू सोनवणे याची चारचाकी फॉर्च्युनर गाडी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सोनवणे याच्यावर नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी या तीन पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पारनेर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. सोनवणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्याचे कोण कोण साथीदर आहेत याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढत जाणार आहे. दरम्यान, नगरमधील आधीच गाजलेल्या हनीट्रॅपमध्ये बाळ बोठे या कथीत पत्रकाराच्या संपर्कात जखणगाव येथील ही कथीत महिला संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. याच महिलेशी बोठे याची जवळीक होती आणि त्यातूनच रेखा जरे आणि बोठे यांची अनेकदा भांडणे झाल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे जखणगाव येथील ही कथीत महिला हनीट्रॅप अनेक वर्षांपासून करत असल्याचेही समोर आले आहे. बोठे आणि या महिलेचे कनेक्शन पोलिसांना मिळाले असून याबाबत अधिक माहिती लवकरच समोर येणार असल्याचे अधिकृतसुत्रांनी सांगितले.
No comments
Post a Comment