Breaking News

1/breakingnews/recent

20 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री - मराठी मनोरंजन क्षेत्रातील अडचणींचा राज ठाकरेंनी घेतला आढावा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा



TOP HEADLINES

1. शेती खतांबाबत केंद्र  सरकारचा मोठा शेतकऱ्यांना जुन्याच दराने मिळणारं खत 
केंद्र सरकार  ने शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डी-ए-पी म्हणजेच आमोनियम फॉस्फेट (DAP) खतांवर मिळणारे अनुदान 14% नी वाढवले आहे. शेतकऱ्यांना डीएपी आता 1200 रुपये गोणी या दराने DAP Fertilizer Rate मिळणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत डीएपीवर 500 रुपये प्रति गोणीवरुन वाढ करत अनुदान 1200 रुपये प्रति गोणी करण्यात आले. 

२. लस घेण्यास टाळाटाळ त्यांच्या जिवावर बेतली
 करोना प्रतिबंधात फ्रंटलाइन वर्कर असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना लस घेण्यास केलेली टाळाटाळ जीवावर बेतली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचा आकडा 10 वर गेला असून, त्यातील 9 जणांनी लस घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. 

3. मोदी सरकार हे डीडी इंटरनॅशनल चॅनेल स्थापन करणार आहे.  
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे दूरदर्शन आता नवीन चॅनेल सुरु करणार आहे. डीडी इंटरनॅशनल असं या नव्या चॅनेलचं नाव आहे. बीबीसी वर्ल्डच्या धर्तीवर मोदी सरकार हे डीडी इंटरनॅशनल चॅनेल स्थापन करणार आहे. देशातील अंतर्गत प्रकरणे आणि जागतिक विषयांवर भारताची भुमिका आणि आवाज जागतिक पातळीवर मांडण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून या चॅनेलची निर्मिती केली जाणार आहे.

४. "राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीपाच्या मशागतीसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे"
पावसाळ्याची चाहूल लागून शेतीमधील खरिपाचा हंगाम जवळ येताच शेतीच्या प्रश्नांवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही शेतीच्या प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घेत मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, 

5. मराठी मनोरंजन क्षेत्रातील अडचणींचा राज ठाकरेंनी घेतला आढावा

देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान वाढत चालले आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तसेच चित्रपट व मालिकांच्या शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे काही शूटिंग्स इतर राज्यात होते आहे. 

६."ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही"

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरघोड्याही अधूनमधून सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका करण्यात आली आहे. 


७. सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती

देशात कोरोना संसर्गामुळे अनेक परिवार उध्वस्त झाली आहेत. कित्येकांनी आपले जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ठ आणि आई-वडिलांनाही गमावलं आहे. मुले लहान असतानाच आई-वडिलांचं छत्र हरवल्याने कित्येक कुटुंबातील चिमुकली अनाथ बनली आहेत. या अनाथांना आधार देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 


८. जवळच्या केंद्रात लस आहे की नाही? आता व्हॉट्सऍपवर समजणार, सरकारने जारी केला नंबर

 कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने लस पोहोचावी यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आरोग्य मंत्रालयाने एक मोबाईल नंबर प्रसिद्ध केला आहे. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या लसीकरण केंद्रात लस उपलब्ध आहे की नाही? याची माहिती मिळवू शकता. आरोग्य मंत्रालयाने ९०-१३-१५-१५-१५ हा क्रमांक प्रसिद्ध केला आहे


९. हवेत दहा मीटरपर्यंत पसरू शकतो कोरोना विषाणू; नव्या मार्गदर्शक सूचना जारी

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट उच्छाद घालत असतानाच केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांच्या कार्यालयाने कोरोनाच्या संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  भारतामध्ये पुन्हा एकदा सार्स CoV-2 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले की, रुग्णालयात आणि घरांमध्ये उत्तम व्हेंटिलेशनच्या माध्यमातून संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो. 

१०. म्हणून लसीचा दुसरा डोस 30 दिवसांतच घेतला, टोपेंकडून टीकाकारांची बोलती बंद
कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, केंद्राकडून कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट 84 दिवसांनंतरच दिली जाणार आहे. त्यामुळे, दुसरा डोस घेतलेल्यांना 84 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 30 दिवसांतच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *