कोरोना काळात गरम पाणी पिताय? मग जाणून गया त्याचे फायदे, वाचा
News24सह्याद्री -
गेल्या वर्षभरापासून प्रत्येक जण कोरोना विषाणूचा सामना करत आहे. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसून अद्याप या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेल नाही आहे. त्यातच या विषाणूची दुसरी लाटदेखील येऊन ठेपली आहे. म्हणूनच, या काळात प्रत्येकाने स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे गरम पाणी पिणे, गरम पाण्याची वाफ घेणे, काढा घेणे असे अनेक घरगुती उपाय सध्या प्रत्येक घराघरात सुरु आहे. विशेष म्हणजे आता प्रत्येक घरात दररोज गरम पाणीच प्यायले जात आहे. म्हणूनच कोरोना काळात गरम पाणी पिण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
१. सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो -
अनेकदा सर्दी किंवा खोकल्या झाल्यावर छातीत कफ जमा होतो. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यामुळे हा कफ पातळ होण्यास मदत होते. परिणामी, नाक सतत बंद होणे, वास घेण्यास त्रास होणे या समस्यांपासून सुटका मिळते.
२. शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते -
उघड्यावरील किंवा बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात नकळतपणे अनेक विषारी घटक प्रवेश करत असतात. त्याचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात आपल्या आरोग्यावर होत असतो. हे विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी गरम पाणी ही योग्य उपचार पद्धती आहे. गरम पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होतं. ज्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.
३. पचनक्रिया सुधारते -
निरोगी आरोग्य हवं असेल तर आपली पचनयंत्रणा सुरळीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जर पचनयंत्रणेत बिघाड झाला तर बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अॅसिडीटी अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच जेवण झाल्यावर दररोज गरम पाणी प्यावं. गरम पाणी प्यायल्यामुळे अन्नपचन सुरळीत होते, ज्यामुळे पोटाशीनिगडीत किंवा पचनयंत्राशी संबंधित कोणत्याही तक्रारी जाणवत नाही.
४. रक्ताभिसरण सुरळीत होते -
गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुरळीतरित्या होते.

No comments
Post a Comment