Breaking News

1/breakingnews/recent

२6 मे Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - दुकान फोडून महिलांचे शृंगार साहित्याची चोरी....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. दुकान फोडून महिलांचे शृंगार साहित्याची चोरी
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत  बजाजनगर मोहटादेवी परिसरातील देवगिरी नगर येथील एक दुकान फोडून अज्ञात चोरटयांनी अठ्ठावीस हजाराचे साहित्य लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. बेन्टेक्स साहित्याच्या दुकानाचे कुलूप तोडून सोमवारी रात्री अज्ञात चोरटयांनी रोख तीन हजार रुपये व पंचवीस हजारांचे साहित्य असे एकूण अठ्ठावीस हजाराचे साहित्य लंपास केले.  

2. ५४ वर्षाच्या महिलेने केली म्युकोरमायकोसिसवर मात !
कोरोनापाठोपाठ 'म्युकोरमायकोसिस आजाराने सध्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे केलंय.बुरशीजन्य आजार असणाऱ्या या म्युकरमायकोसिसचे सध्या राज्यभरात रुग्ण आढळू लागले असून कल्याण डोंबिवलीतही त्याने डोकंवर काढले आहे.या घडीला या आजाराचे 15 रुग्ण आढळून आले असून त्यामधील तिघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मात्र डोंबिवलीत एक दिलासा दायक बातमी समोर आली आहे.

3. पोलीस आयुक्तपदाची जयजित सिंह यांनी सूत्रे स्वीकारली
राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक फणसळकर यांची ठाण्यातून बढतीवर बदली झाल्यानंतर मंगळवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याकडून घेतली. फणसळकर यांच्या बदलीनंतर तब्बल २० दिवसांनी राज्याच्या गृहविभागाने या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती केली.

4. क्षुल्लक कारणावरुन राबोडीतील तरुणावर गोळीबार
काही किरकोळ कारणावरुन मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान  यांच्यावर चाकूने हल्ला करीत पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या घटनेमध्ये खान गंभीर जखमी झाले असून गोळी चुकल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी शबीर अब्दुल गौस याला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

5. पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख
देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुबोध कुमार जयस्वाल यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश एन व्ही रमना आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत.

6. यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम
पंढरीच्या सावळया विठूरायाच्या भेटीसाठी शेकडो वर्षापासून निघणारी पालखी सोहळ्यावर यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेण्यात आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

7. यवतमाळमध्ये अभियंत्याला लाच घेताना अटक
यवतमाळ शहरात केलेल्या नाली बांधकामाचे देयक काढण्यासाठी नगरपरिषदेतील स्थापत्य अभियंत्याने १४ हजाराची मागणी केली. संबंधित कंत्राटदाराने याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानंतर एसीबीचे पथक सात दिवसापासून मागावर होते. मंगळवारी दुपारी नगरपरिषदेच लाच स्वीकारताना अभियंत्याला अटक करण्यात आली.

8. हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केलेले असतानाही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्काबार, दारूचे दुकान सुरू होते. अशा १८ आस्थापना हिंजवडी पोलिसांनी मंगळवारी  सील केल्या आहेत.

9. तौक्ते उद्या धडकणार बंगालमध्ये
तौक्ते चक्रीवादळ शमत नाही तोच बंगालच्या उपसागरावर यास चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केले असून भारतावर धडकण्याआधीच विध्वंस सुरु केला आहे. पश्चिम बंगालच्या नईहाटी आणि हालीशहरमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून बुधवारी वादळ आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे.

10. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत तब्बल ३६ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *