25 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - राजभवनातून 12 आमदारांची यादी गहाळ...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. 'टीव्हीवर येऊन रडायच नाही, कोण कसा अभिनय करतयं हे माहितीय'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधलाय. त्यावेळी पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला, ते भावुक झाले. त्यानंतर, सोशल मीडियातून अनेकांनी त्यांनी खिल्ली उडवली. आता, खासदार इम्तियाज जलिल यांनीही मोदींच्या भावूकपणाला अभिनय म्हटलंय. तसेच, देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तर आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन 'दीदी ओ दीदी' असं करत होते, असा टोलाही लगावला आहे.
2. गाय आमची माता, तिच्या सुरक्षेसाठी गोसुरक्षा विधेयक आणणार- आसामचे मुख्यमंत्री
आसाममध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सत्ता राखली. यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री सर्मा यांनी गोसुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय राज्य सरकार गायींच्या सुरक्षेसाठी संविधानाच्या चौकटीत राहून आवश्यक पावलं उचलेल, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनी सांगितलं.
3. सुशील कुमारची रेल्वेच्या नोकरीतून हकालपट्टी
युवा कुस्तीपटू सागर धनकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला उत्तर रेल्वेने त्याच्या पदावरून निलंबित केले आहे. सुशील उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
4. महाविकास आघाडीचं राजकारणावर लक्ष, राजकारणाचा महारोग जडलाय; शेलार
कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार धरता. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे. यांना राजकारणाचा महारोग जडला आहे.
5. मोदी सरकार आणखी एक पॅकेज देण्याच्या तयारीत, 'या' क्षेत्रांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता
कोरोना साथीच्या काळात लोकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लवकरच आणखी एक मदत पॅकेज जाहीर करण्याच्या विचारात आहे. याचा फायदा लहान आणि मध्यमवर्गीय कंपन्यांना होणार आहे. तसेच पर्यटन, विमान चालन आणि प्रवासी उद्योगाशी संबंधित लोकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार, काही खासगी संस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिलीय. त्याबाबत वित्त मंत्रालयाशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय.
6. राजभवनातून 12 आमदारांची यादी गहाळ
राजभवनातून विधानपरिषदेतील 12 नाम निर्देशित सदस्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पुण्यातील शिवसेना शहर प्रमुखांनी केली आहे. . राजभवनासारख्या अती महत्त्वाचा वास्तूमधून ही यादी गहाळ होणे हे अत्यंत दुर्दैवी, निंदनीय बाब आहे. राजभवनातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. तसेच याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या निवेदनात करण्यात आली आहे.
7. बारावीच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, ऑनलाईन परीक्षा हा देखील पर्याय, बिहारच्या शिक्षणमंत्री
बारावीच्या परीक्षा घेतल्या जाव्यात ही बिहार सरकारची भूमिका आहे. बिहारचे शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांचं आयोजन केलं जावं, असं म्हटलं. बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणात आणि आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात.
8. जूनच्या पहिल्या आठवड्यात काळ्या बुरशीवर ६० हजार इंजेक्शन उपलब्ध होणार - राजेश टोपे
राज्यात म्युकर- मायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फो-टेरे-सीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढलीय त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
9. तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!
किंग कोहली’ या नावाने प्रसिद्ध असणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे सध्या जगातील अव्वल फलंदाज म्हणून पाहिले जाते. विराट कोहली वाऱ्याच्या वेगाने एक-एक रेकॉर्ड तोडत असून क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
10. आशिया करंडक स्पर्धा आता दोन वर्षे लांबणीवर
आशिया करंडक स्पर्धा आता 2023 साली होणार असल्याचे आशिया क्रिकेट समिती, पाकिस्तान क्रिकेट मंडळ व श्रीलंका क्रिकेट मंडळाने जाहीर केलेय यावर्षी जून महिन्यात या स्पर्धेचे श्रीलंकेत आयोजन करण्यात आले होते. मात्र, करोनाचा धोका पाहता ही स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली.
No comments
Post a Comment