Breaking News

1/breakingnews/recent

31 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री मुख्यमंत्र्यांच्या वाढीव लॉकडाऊन निर्णयाचं कौतुक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


१. पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी किराणा मालाचे गोडाऊन फोडले
काल रात्री जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. जोरदार बरसत असलेल्या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मुरुड, अकोला, लातूर बर्शिरोड वरील विनोद भुतडा यांचे भुतडा किराणा मालाचे गोडाऊन चोरट्यांनी फोडले. आणि गोडाऊन मधील 2 लाख 50 हजार रुपयांचा किराणा माल लंपास केला. 

२. लॉक डाऊन काळात एसटी महामंडळाला 15 कोटी रुपयांचा तोटा..
राज्यात लॉकडाऊन असल्याने प्रवाशांची होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील इतर विभागांपैकी लातूर विभागाला 15 कोटी रुपयांचा तोटा या लॉकडाऊन काळात सहन करावा लागतोय. कोरोणाची साखळी तोडण्यासाठी सरकार तत्परतेने अनेक उपाय योजना करत आहे. लॉकडाऊन केल्याने जिल्हा बंदी करण्यात आली. आणि होणाऱ्या वाहतुकीला आळा बसला. लातूर विभागामध्ये 5 डेपो आणि छोटे मोठे 22 बस स्थानक आहेत. 

३. रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. आज पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी प्रतिलिटर महागले आहे. दरम्यान, पेट्रोल दरवाढीवरून आता राजकारण तापले असून आरोप-प्रात्यारोप सुरू झाले आहेत. दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

4. मुख्यमंत्र्यांच्या वाढीव लॉकडाऊन निर्णयाचं कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याचं सांगितलं. तसेच, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, तेथील वैद्यकीय यंत्रणांची उपलब्धता पाहून त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत किंवा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यासाठी, जिल्हा पातळीवर आढावा घेण्यात येत आहे.

५. देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी,
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

६. पदोन्नतीमध्ये पुन्हा आरक्षण लागू केल्यास रस्त्यावर उतरु
ज्य सरकारने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा  आदेश काढला होता. 

७. ओबीसी आरक्षणावर मार्ग काढणार: नवाब मलिक
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ओबीसी आरक्षणावर मार्ग काढण्यात येईल. कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतर ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करून पुढे जाऊ, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

 ८. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं  
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग ओसरत असला तरी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक राज्यात लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. तर अनेकांना नावं नोंदवूनही लस मिळणं कठीण झालं आहे. केंद्र सरकारने राज्यांना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची परवानगी दिली आहे. 

९. पेट्रोलने गाठली शंभरी
पुणेकरांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. कारण पुण्यातल्या पेट्रोलच्या दराने आता शंभरचा आकडा पार केला आहे. फक्त पेट्रोलच नाही तर सीएनजी आणि डिझेलचे दरही कमालीचे वाढले आहेत. हा आकडा शंभरी पार करुन गेला असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

१०. अजित पवारांची रामदास आठवलेंना विनंती
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली. त्यामुळे मी रामदास आठवले यांना तौक्ते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी विनंती करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *