Breaking News

1/breakingnews/recent

31 मे Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - मराठा आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये




TOP HEADLINES

1. 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद

राज्यात आज गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात आज 18 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 22 हजार 532 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.55 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 402 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

2. कोरोनामुक्त गावाचा संकल्प करुया, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुन देशासमोर उत्तम उदाहरण घालून देऊया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी   सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोना, लॉकडाऊन, च्रकीवादळ यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. 

3. परराज्यातील प्रवासी टेस्ट न करताच थेट घरी 
रराज्यातून महाराष्ट्रात येत असताना आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट करणे बंधनकारक आहे. ही टेस्ट केली नसेल तर महाराष्ट्रात येऊन टेस्ट करून मगच पुढे सोडण्यात येते. ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यासाठी प्रत्येक स्टेशनवर महापालिकांतर्फे टेस्टिंग करण्याचे केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र ठाणे स्थानकात या नियमाला बगल देऊन इतर राज्यातील प्रवाशांना थेट घरी सोडण्यात येत आहे.

4. लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करताय  -  प्रविण दरेकर
राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. एकीकडे सरकार कोरोना कमी होतोय असं म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करतयं हेच कळत नाही, अशी खोचक टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

5. चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफ यांचा तोल सुटला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल सुटला. चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही. त्यांना मस्ती आली आहे, असं धक्कादायक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

6. मराठा आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्याची टीका भाजपच्या नेतेमंडळींनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे या भाजपच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारवर केलेल्या टीकेला काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. संजय लाखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

7. आ. संजय शिरसाठ यांच्यातर्फे कामाची पाहणी.
औरंगाबाद पश्चिम भागातील महत्वाचा असलेला बीड बायपास या रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालु आहे. आज या रस्त्यावरील सातारा परिसरातील संग्रामनगर येथील उड्डाणपुलाच्या चालु असलेल्या कामाची आमदार संजय शिरसाठ यांनी पाहणी केली.

8. नवीमुबंई विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावाची मागणी 
नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.यासाठी आगरी,कोळी,कुणबी आणि भूमिपुत्र एकवटले आहेत.येत्या 10 जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी करत विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र आंदोलन करणार आहेत.

9. शिवसेनेचे एकनाथ पाटील यांच्याविरोधात सुनेची तक्रार 
 घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याची घटना डोंबिवली मध्ये समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही शिवसेनेची पदाधिकारी असून हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओच्या आधारे सूनेने आपल्या सासऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे सध्या  शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक प्रमुख एकनाथ पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याबाबत पाटील यांनी सांगितले की हे सर्व खोटे आरोप आहेत. भाजपाचे पदाधिकारी संदिप माळी यांच्या सांगण्यावरुन हे केले आहे.

10. पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे पुणे शहरातील निर्बंध काही अंशी शिथील होणार आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने (Shops) आता सकाळी 7 ते दुपारी दोनपर्यंत उघडी ठेवली जातील. तसेच आणखी काही सेवांना सवलत मिळण्याची शक्यता आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *