Breaking News

1/breakingnews/recent

28 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - ११ वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


१. पुण्यात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग
पुण्यात  एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हवेली तालुक्यातल्या वाघोली परिसरात ही आग लागलीये . या आगीचे व्हिडिओ समोर आले असून  व्हिडिओ पाहिल्यावर या आगीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

२. राज्यात पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढणार
पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढवला जाणार, पण यावर अंतिम निर्णय व्हायचाच....गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार, ज्या जिल्ह्यात रुग्णांच  प्रमाण कमी झालं आहे तिथं काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेय .

३. अशोक चव्हाणांचा भाजपाला इशारा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोर्चात भाजपाही सामिल झाला आहे. त्यावरून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केलीये . मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. 

४. राष्ट्रवादीची ठाण्यात होर्डिंगबाजी
 पेट्रोलचे दर शंभर रुपयांवर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने मोदी सरकार ‘मॅन ऑफ दी मॅच’, ‘अच्छे दिनाच्या शुभेच्छा’, असा खोचक मजकूर असलेली होर्डिंग्ज ठाण्यात लावली आहेत. राष्ट्रवादीच्या या हटके आणि खोचक होर्डिंगबाजीची ठाण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

५. 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केलेत. वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावणार असल्याचं सांगितलय ... ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत  संधी उपलब्ध राहतील, असंदेखील त्यांनी  म्हटलंय. वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना सरकसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असून ....अकरावी प्रवेशासाठी पुढील काळात ऑनलाईन सीईटी आयोजित केली जाणर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

६. मराठा आरक्षणावर निलेश राणेंची टीका
 मराठा आरक्षणावरून भाजप खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद वाढताना दिसतायेत . आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी छत्रपतींवर टीका केलीये . राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. 

७. जैविक कचरा उघड्यावर फेकून कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या रुग्णालयाला नोटीस
कोरोना रुग्णालयाती जैविक कचरा हा घातक असल्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणं जास्त आवश्यक असतं. मात्र, कोरोना रुग्णालयातील हाच कचरा रस्त्यावर उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार 24 मे रोजी बुलडाण्यात उघड झाला होता. याप्रकरणी शहरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतिये. याशिवाय या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषद अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याचेही उघड झाले आहे .

८. 2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी
2000 रुपयांच्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. खरं तर 2000 रुपयांच्या नोटांचा  नवीन पुरवठा होणार नसल्याचं 26 मे रोजी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं होतं. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर लाँच करण्यात आलेल्या या नोटांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या नोटा आता हळूहळू चलनातील पुरवठ्यातून कमी होत आहेत. 

९. ३१ मे पासून दिल्लीत अनलॉक
कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर आता देशातील काही भागात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 31 मे पासून अनलॉकिंगला सुरुवात होणार आहे. मोठ्या कष्टाने आणि कठीण प्रसंगांमधून कोरोनावर नियंत्रण मिळू शकलं. पण लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे हळूहळू अनलॉकिंग केलं जाईल, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांनी म्हटलंय.

१०. कपिल देव यांचा विराट कोहलीला महत्त्वपूर्ण सल्ला
भारताचा इंग्लंड दौरा येत्या काही दिवसांतच  सुरु होतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत  आणि न्यूझीलंड  या आयसीसीच्या  कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *