28 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांत तुफान राडा......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. अविरत मदतकार्य तर्फे बुध्द पौर्णिमेनिमित्त मास्क वाटप..
औरंगाबाद मध्ये वाढत असलेले कोरोना रुग्न यांच्या संख्येला आळा बसण्यासाठी बुद्धपोर्णिमा_निमित्त औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथील रस्त्यावरील निराधार गोरगरिबांना,अविरत_मदतकार्य मित्र परिवारातर्फे 100 कापडी मास्क वाटप करण्यात आले, आणि बुद्धपोर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी विजुभाऊ वाहुळ, शैलेश चाबुकस्वार, शरद रंधवे,सुदर्शन काळे,संदीप वाहुळ,सचिनभाऊ,किरण पतंगे, जना खोतकर,अभिषेक दुबे,निलेश सोनवणे, बंटी साळवे, करण माळी.
2. गुंड विशाल फाटे खुन प्रकरणातील चार आरोपी जेरबंद
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर परिसरात दहशत माजविणाºया कुख्यात गुंड विशाल उर्फ मड्या फाटे याचा खुन करुन फरार झालेल्या चौघा आरोपींनी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेरबंद केले. विशाल याचा खुन केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित अवघ्या २४ तासाच्या आत या खुन प्रकरणातील ३ मुख्य आरोपी जेरबंद करण्यात आले होते.
3. किन्नर माँ संस्थेकडून मदतीचा हात !
कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीसह लॉकडाउन आहे. त्यामुळे किन्नर व गरजवंतांना रोजगार नसल्याने.आशा परिस्थितीत सकल आदिवासी संस्था,टीम परिवर्तन व किन्नर माँ संस्था यांनी आंबिवली,शहाड,गोविंदवाडी या भागातील गरजू किन्नरांना अन्नधान्याचे किट वाटप केले आहे.
4. डोंबिवलीत लॉक डाउन काळात पुस्तक वाचकांची संख्या वाढली
डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते त्याचसोबत इथली वाचन संस्कृती टिकवण्याचे काम हे पै फ्रेंड्स लायब्ररी गेले ३५ वर्षा पासून करत आहे.साडेतीन लाखाहून अधिक पुस्तके आणि वीस हजारापेक्षा अधिक वाचक सदस्य असलेल्या लायब्ररीची नोंद थेट लिम्का बुक ने देखील घेतली आहे.
5. चंद्रपुरातील दारूबंदी उठविली
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सहा वर्षांनंतर उठविण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी त्याबाबतचा निर्णय घेतला. दारूबंदीमुळे अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारी जिल्ह्यात बोकाळली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समर्थन राज्य शासनाने केले आहे.
6. राज्यात निर्बंध होणार शिथिल!
राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन सुरूच राहील पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करतील.त्यानंतर एक-दोन दिवसांत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.
7. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे
राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २९ सदस्यांचीही पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.सदस्यांमध्ये, उत्तम कांबळे, डॉ.नागनाथ कोतापल्ले, फ.मु. शिंदे, डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते आदींचा समावेश आहे
8. मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा
मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलविरुद्ध विनापरवाना रुग्णालय सुरू ठेवून जादा बिलाची आकारणी करून रुग्णांची फसवणूक केल्याबद्दल महापालिकेने गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोग्याधिकारी डाॅ. सुनील आंबोळे यांनी याबाबत गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
9. मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांत तुफान राडा
मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख आणि पावसाळा जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसे मनसे आणि शिवसैनिकांमधील वाद तापू लागले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून होत असलेला वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे.
10. बोर्डाची 12 वीची परीक्षा केवळ 30 मिनिटांचीच होणार
कोरोना महामारीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालाकांमध्ये सीबीएसईच्या 12 वीची परीक्षा होणार की नाही, यावर संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे 1 जूनला 12 वी परिक्षेच्या तारखांची घोषणा करणार आहेत. बोर्डाची 12 वीची परीक्षा केवळ 30 मिनिटांचीच होणार.
No comments
Post a Comment