24 मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - जमीन नांगरताना शेतकऱ्याला सापडला प्राचीन मुकूट....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. लातूरमध्ये आरोग्य विभागाची उदासीनता उघडकीस
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामन्य व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र आरोग्य विभागाची उदासिनता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनास्था आणि कर्मचाऱ्यांची चालढकल वृत्तीमुळे आजही ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.निलंगा तालुक्यातील अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत केळगाव प्राथमिक उपकेंद्र सुरु आहे. मात्र कोरोनाच्या भयानक परिस्थिती मध्ये मागील दोन महिन्यापासून आरोग्य केंद्राला टाळे असल्याने आरोग्य केंद्र बंद आहे.
२. बोलेरोची ट्रकला धडक
मजुरीच्या कामासाठी हैदराबादला जाणाऱ्या बेलोर च्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने, झालेल्या अपघातात बोलेरोचा वाहन चालक महेश सिंगनदुपे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली प्रवासी सोनिया पंचवे ही जखमी झालीय . तिला भंडाऱ्याच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय.
३. मुंबईत मंत्रालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन
मुंबईत मंत्रालयासमोर सरकारविरोधात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध यावेळी केला आहे, मात्र पोलिसांनी यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
४. पुण्यात खासगी लसीकरण केंद्रावर गर्दी
पुण्यात आज कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना एकच गर्दी केली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर पहाटेपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. या गर्दीवरून आता पुणेकरही कोरोनापासून बचाव करण्यासाठी सात्रक झाले असल्याचं पाहायला मिळालं आहे.
५. आमदाराच्या पत्नीचा ब्रीजवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई शहरातील मानखुर्दमधील ब्रीजवर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही महिला आमदाराची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. एका दुचाकी चालकाने महिला ब्रीजवर चढली असून रडत असल्याची माहिती दिली असता ब्रीजवर पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेत या महिलेस आत्महत्या करण्यावाचून रोखले.
६. खा.संभाजीराजे छत्रपती यांचा महाराष्ट्र दौरा
मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या २७ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांनी केलीय. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
७. ४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले 10 ग्रॅम सोन्याचे दर
मजबूत जागतिक निर्देशांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात व्यापार सत्रात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. अमेरिकन चलन डॉलरची घसरण आणि वाढती महागाई यांच्या दबावामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. व्यापार सत्रादरम्यान, जून वायदा सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 0.27 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
८. २०२१ चे पहिले चंद्रग्रहण २६ मे ला लागणार
2021 या वर्षातले पहिले चंद्रग्रहण दोन दिवसांनी म्हणजेच 26 मे ला लागणार आहे. मात्र हे खग्रास चंद्रग्रहण इतर चंद्रग्रहणांसारखे सामान्य नाही हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. यावर्षीच्या या ग्रहणाला एक वेगळे महत्त्व आहे. यादिवशी तीन खगोलीय घटना घडणार आहेत.सुपरमून , रेड ब्लड मूनआणि चंद्रग्रहण या त्या तीन खगोलीय घटना आहेत.
९. जमीन नांगरताना शेतकऱ्याला सापडला प्राचीन मुकूट
धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील रामा माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागत करताना प्राचीन मुकूट सापडलाय. हा मुकूट पंचधातूचा असून दोन हजार वर्ष जुना असल्याची माहिती समोर आली आहे. दिगंबर माळी यांना हा मुकूट जमिनीत दिसला. त्यानंतर हा मुकूट बाहेर काढण्यात आला. दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मुकुटाची पाहणी केली.
१०. बाळाला झोपवण्यासाठी डॉक्टरांनीच गायली अंगाई
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डॉक्टर वर्गावरील भार आणखीनच वाढला असला तरी हे सर्वजण आपले कर्तव्य पार पाडत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुळ्यातील एका डॉक्टरांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. धुळ्याच्या निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिटमधील डॉ. अभिनय दरावडे यांनी फेसबुकवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांच्या रुग्णालयात नुकतंच एक बाळ जन्माला आलं आहे. काही दिवसांपूर्वी हे बाळ रात्रीच्यावेळी जोरजोरात रडू लागलं. काही केल्या बाळ शांत व्हायला तयार नव्हते.
No comments
Post a Comment