20 मे Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - स्कूल बॅग उत्पादकांवर कोरोनाच्या मृतदेहाची बॅग बनवण्याची वेळ....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. स्कूल बॅग उत्पादकांवर कोरोनाच्या मृतदेहाची बॅग बनवण्याची वेळ
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत २० वर्षा पासून स्कूल बॅग बनवणारे लघु उद्योजक कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे पूर्ण बंद पडल्यामुळे कारखान्यातील कामगारावर उपासमारीची वेळ आली त्यांच्याकडे क मीत कमी१५० कामगार काम करत असून यात ९० महिला कामगार आहेत .तर ६० पुरुष कामगार काम करतात. गेल्यावर्षी मार्चमहिन्यात कोरोनाने वाळूज महानगरात शिरकाव केला होता . दरम्यान , कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षांपासून राज्यातील शाळा बंद असल्याने स्कूल बॅग विक्री बंद झाली आहे.
2. पंढरपूरात गाडी लावण्याच्या कारणावरुन चौघांना बेदम मारहाण
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या पंढरपूरात गाडी लावण्याच्या कारणावरुन चौघांना बेदम मारहाण करणाºया ८ जणाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूरातील सय्यद जब्बार गफ्फार हा भंगार विक्रेता असून गुरुवार पुठ्याने भरलेले वाहनचालक अलीम शेख याने दुकानासमोर हे वाहन उभी केले होते. यावेळी सय्यद जब्बार याचा मामा शेख मुसा याने येथे गाडी का लावली, ही जागा तुझ्या बापाची आहे का, असे म्हणून वाद घालण्यास सुरवात केली होती. हा वाद सुरु असतांना जब्बार याने मामा शेख मुसा यास समजावण्याचा प्रयत्न केला.
3. सोशल मिडीयावर व्हिडीओ करून दिले पोलिसांना आव्हान
पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून तिघांनी राहुल सोनार याच्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी आयरेगाव, समतानगर झोपडपट्टीत घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आता रोहित धोत्रे, विकास नवले आणि ओमकार या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान दिले होते.
4. युवा सोनार संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे अन्नदान
संध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने काही प्रमाणात हाॅटेल बंद असल्याने रूग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांचे हाल होतांना दिसत अहे तर या अनुषंगाने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे युवा सोनार संघटणेच्यावतीने रुग्णांच्या नातेवाइकांना एक हजार पुरी भाजी चे पॅकेट आणि एक हजार मास्क चे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य दहिवाळ , संस्थापक उपाध्यक्ष शुभम दहिवाळ, संस्थापक सचिव अजय जडे, संस्थापक कार्याध्यक्ष निखील महाले, अविनाश उडानशिव,जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, आदी उपस्थित होते .
5. तौक्तेचे २६ बळी, ४९ बेपत्ता तर १८६ जणांची सुखरूप सुटका
तौक्ते चक्रीवादळामुळे उधाणलेल्या समुद्राच्या तडाख्यात सापडून भरकटलेल्या ५ नौकांपैकी पी-३०५ या बार्जवरील २६ जणांचे मृतदेह बुधवारी तटरक्षक दल पथकाच्या हाती लागले. उर्वरित ४९ जणांचा शोध अद्याप सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत या बार्जवरील १८६ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. दोन दिवसांत पाच बार्जवरील ६२२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
6. "कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात?
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे राजकारणी व सेलिब्रिटींना कशी मिळतात? असा सवाल करीत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
7. रिक्षाचालकांनो, आता २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करा
कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारने दीड हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. अनुदान वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ मेपासून रिक्षाचालकांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या अनुदानासाठी आवश्यक सर्व निधी राज्य सरकारकडून उपलब्ध झाला आहे. ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्वरित जमा होणार असल्याची माहितीही परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
8. डिटोनेटर स्फोटक प्रकरणात संगमनेर येथून आणखी एकाला अटक
भिवंडीमध्ये मिळालेल्या १२ हजार जिलेटीनच्या कांडया आणि मोठया संख्येने हस्तगत केलेले डेटोनेटर या स्फोटकांच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी अमोल वाल्मिक जोंधळे या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यालाही २२ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
9. लहान मुलांवरील उपचारासाठी ३०० बेडची व्यवस्था
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून लहान मुलांकरिता वायसीएममध्ये ऑक्सिजनचे दीडशे, आयसीयूचे तीस आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात दीडशे बेडची व्यवस्था केली जाणार आहे, जिजामाता हॉस्पिटलमध्ये मुलांसोबत आईला राहता येईल, कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी २५ लाख डोस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे.
10. रुग्णाची तब्येत बिघडल्यास महापालिका देणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स
पिंपरीमध्ये कोरोना रुग्णाची ऑक्सिजन अभावी प्रकृती बिघडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात घरी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खासगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून महानगरपालिकेस शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विविध यंत्रसामुग्री देत आहेत.
No comments
Post a Comment