Breaking News

1/breakingnews/recent

19 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री - राहुल गांधी संतापले...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 जूनपासून
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

2. राहुल गांधी संतापले
करोना परिस्थितीवरून विरोधक सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. देशातील लसीकरण सुद्धा ठप्प झाले आहे. विरोधकांनी मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले आहे. भारतात गेल्या काही दिवसांत करोनाच्या रोजच्या घटनेत घट झाली आहे, परंतु मृत्यूची संख्या कमी होत नाही.

3. संजय राऊतांनी लगावला टोला
३.पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. टूलकिट तसंच राहुल गांधींकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी हा आरोप केला. दरम्यान देशात अगदी उद्या निवडणूक झाली, तरी मोदी सरकार ४०० जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे. 

4. अमृतसरच्या नंगली गावाजवळील घटना
अमृतसरच्या नंगली गावाजवळील मजीठा रोडवर फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. लुटारू इतक्यावरच थांबले नाहीत त्यांनी त्या कर्मचाऱ्याचे हात कापल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

5. बाधितांच्या संख्येत घट होत असताना वाढत्या मृत्यूंनी वाढवली चिंता
करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. आता हळूहळू नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे करोना मृत्यूची लाट आल्याचंच दृश्य आहे. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. 

6. युद्धपातळीवर शोधमोहिम सुरू; १८४ जणांना वाचवण्यात यश
तौते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला. वादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ हा तराफ्याचा नांगर वाहवत गेला आणि तराफा भरकटला. त्यानंतर तराफा बुडल्याची माहिती समोर आली होती. तराफ्यावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. 

7. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासून तयारी सुरु करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा धोका पाहता लसीकरणावर जोर देण्यात येणार आहे. त्यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला २ ते १८ वर्षांमधील मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याची परवानगी १२ मे रोजी देण्यात आली आहे. 

8. ४८ तास वीजपाण्याविना
तौक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारची रात्र  अंधारात काढावी लागली. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या आणि रोहित्रेदेखील वादळामुळे पडली.  महावितरणची विद्युत उपकेंद्रे खंडित झाली होती. शहरातील अनेक भागांतील नागरिकांना ४८ तासांपेक्षा अधिक वेळ विजपाण्याविना काढावी लागली. 

9. ‘आप’चा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. करोनाविरुद्धच्या लढय़ात राज्यातील आणि जिल्ह्य़ातील अधिकारी हे ‘फिल्ड कमांडर’ आहेत, असे नमूद केलं. स्थानिक स्तरावर प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करून चाचण्यांची व्याप्ती वाढविणे आणि जनतेला योग्य आणि परिपूर्ण माहिती देणे ही करोनावर मात करण्याचे मार्ग आहेत, असं मोदींनी या बैठकीच्या वेळी सांगितलं. 

10. संस्था आली कामाला पण सरकार कोणत्या गावाला
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे, बालगंधर्व परिवार नृत्य परिषद आणि राष्ट्र सेवा दल कलाकार यांच्या वतीने दि 19 मे 2021 रोजी राष्ट्र सेवा दलाच्या आवारात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आदरणीय मेघराज भैया राजेभोसले आणि संचालक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली जीवनावश्यक वस्तू किट वाटप करण्यात आले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *