Breaking News

1/breakingnews/recent

19 मे Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला मोठा फटका....पहा सकाळच्या ताज्याबातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. तिसगाव येथील रमाई नगर ८दिवसांपासून अंधारात
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या तिसगाव येथील रमाई नगर तेथे ८ दिवसापुर्वी नादुरुस्त झालेला विद्युत ट्रान्सफार्मर कर्मचार्‍यांनी दुरुस्तीसाठी नेला. मात्र अद्याप पर्यंत ट्रान्सफार्मची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने गेल्या ८ दिवसांपासून तिसगाव खवडा डोंगर परिसर अंधारात आहे. उन्हाळ्याच्या दिवसामुळे अंगाची लाही-लाही होत असतांना या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्री दरवाजे उघडे ठे ऊन झोपावे लागतात त्यामुळे रात्री चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

2. विद्यादानाचे हात सरसावले कोविड रुग्णांच्या मदतीला
भंडारा जिल्ह्यात कोविडचे थैमान पाहता, त्यादृष्टीने रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत करीत असतांना ती कमी पडत आहे. दरम्यान अनेक सोईसुविधांच्या अभावामुळे, रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने, कोविडच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. तेव्हा, कोविड रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वेळ असुन, परिस्थिती सुधारण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या, लाखनी तालुक्यातील, विद्यादानाचे कार्य करणारे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या “साद माणुसकीची समूह लाखनी” व इतर सहृदयी शिक्षकांनी पुढाकार घेवून, तालूका स्तरावर कोविड रुग्णांना मदत करण्यास सरसावले व सामाजिक कार्य केले.

3. महागाई विरोधात कल्याण ग्रामीण मध्ये केंद्र सरकार विरोधात निदर्शने....
कल्याण ग्रामीण भागात  देशात पट्रोल-डिझेलचे भाव हे गगनाला भिडले आहेत. तर गॅस, खाद्य पदार्थ , खतांच्या  किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. या सर्वांची झळ ही सामन्य जनतेला बसत आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इंधन, गॅस, खत, खाद्यपदार्थ दरवाढी विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली आणि लवकरात लवकर  दरवाढ कमी करावी अशी मागणी कल्याण ग्रामीण राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्ता वाजे आणि सरचिटणीस गजानन मांगरूळकर यांनी केली.

4. लघु उद्योजक बनवताय कोरोनाच्या मृतदेहासाठीची बॅग
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत २० वर्षा पासून स्कूल बॅग बनवणारे लघु उद्योजक कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने स्कूल बॅग विक्रीचा व्यवसाय पूर्ण बंद पडल्यामुळे कारखान्यातील कामगार उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे स्कूल बॅग बनविणाऱ्या वाळूज एमआयडीसीतील एका लघु उद्योजक कोरोनाच्या या संकट काळात त्यांच्याकडे कमीत कमी १५० कामगार काम करत असून यात ९० महिला कामगार आहेत.

5. तोक्ते चक्रीवादळात समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात युद्धनौका हेलिकॉप्टर्सचा महत्त्वाचा वाटा
तोक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी 3 बार्ज आणि 1 ऑइल रिग समुद्रात अडकले होते, ज्यामध्ये 700 पेक्षा अधिक लोकं अडकले होते. ज्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश ही आलं. 

6. तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका
तोक्ते चक्रीवादळा चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे आंबा, काजू बागायतींचे झाले असल्याची माहिती अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

7. बेळगाव जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. भारतीय हवामान विभागाने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. 

8. तेलंगणात 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला;
तेलंगणामध्ये कोरोना व्हायरस महामारीच्या  प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यााठी राज्य सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता तेलंगणात 30 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. आधी तेलंगणा सरकारनं 22 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. 

9. उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द
शिवसेना आमदार शहाजी पाटील यांचेसह शिवसेनेच्या तीव्र विरोधाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. यानंतर सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील आणि माढा विधानसभाचे शिवसेना उमेदवार संजय बाबा कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

10. दिलासा...! राज्यात आज 52,898 रुग्ण बरे होऊन
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 28,438 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 49, 27, 480 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *