Breaking News

1/breakingnews/recent

18 मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री - तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे? - निलेश राणें...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. बारामतीत लॉकडाऊनमध्ये शिथीलता .!
बारामती शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली आहे. मंगळवारी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आदेश जाहीर केला. त्यानुसार आता बुधवार पासून किराणा, भाजीपाला फळे दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

२. 'शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या'
 एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. त्यामुळे, विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. आता, खुद्द शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. 

३. ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात -कमला हॅरिस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी त्यांचे टॅक्स रिटर्नचे रिपोर्ट सार्वजनिक केले आहेत. यातून फारच इंटरेस्टिंग अशी आकडेवारी समोर आलीय यातून समोर आलं की, ज्यो बायडन आणि त्यांच्या पतीचं २०२० मध्ये जेवढं उत्पन्न होतं, कमला हॅरिस आणि त्यांच्या पतीने त्यापेक्षा जास्त टॅक्स भरला आहे.

४. कोरोनाकाळात कौतुक झालेल्या आरोग्यमंत्री शैलजा  ह्या  नव्या मंत्रिमंडळात नाही 
केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरणाचे रुग्ण सापडले तरी केरळ सरकारने त्यांचे योग्य व्यवस्थापन केल होते. त्यामुळे केरळ सरकारचे आणि आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचे कौतुक झाले होते. मात्र आता केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊन राज्यात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता आली असतानाही शैलजा यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार नाही. 

५. कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : संबित पात्रा
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचं आहे.

६. प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीचा छापा
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. 

७. फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी ते व्हेंटिलेटर सुरू करून दाखवावेत -काँग्रेसचं आव्हान
 भाजपा नेत्यांचं खोटं उघड पाडणाऱ्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या १७ मेच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकार तसेच गुजरात भाजपा नेत्यांच्या जवळच्या ज्योती सी-एन-सी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या उत्तराने केंद्र सरकारची पोलखोल झाली आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 

८. सोलापुरात मोठी कारवाई  २०० जणांवर गुन्हा दाखल
राज्यात एकीकडे करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन लावण्यात आलेला असताना सोलापुरात हजारोंच्या संख्येने जमाव जमल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सोलापुरात सामाजिक कार्यकर्त्याच्या अंत्यदर्शनासाठी तुफान गर्दी उसळली होती. लॉकडाउन लावण्यात आलेला असतानाही इतक्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. 

९. "तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे?"; निलेश राणें
भाजपा नेते निलेश राणे यांनी मुंबईतील पावसाचा एक व्हिडीओ शेअर करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ. तौत्के चक्रीवादळानंतरचा वरळीमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा एक व्हिडीओ निलेश राणेंनी ट्वीट केलाय आणि आदित्य ठाकरें यांच्यावर टीकास्त्र सोडलं . 

10. करोनावर मात करणाऱ्यांना ९ महिन्यांनंतर लस 
सरकारच्या एका पॅनलने करोनावर मात केलेल्या व्यक्तींना नऊ महिन्यांनंतर करोनाची लस देण्याचा सल्ला दिलाय. लसीकरणासंदर्भातील  एन-टी-एजी-आय  या पॅनेलने हा सल्ला दिला आहे. यापूर्वी सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या पॅनलने दिला होता. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *