Breaking News

1/breakingnews/recent

12 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले; भंडारा तालुक्यातील गराडा गावातील घटना...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

१.वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले
भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळ असलेल्या कालव्याच्या,सायफन टाक्यात, वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळल्याने, एकच खळबळ उडाली. ही घटना, बुधवारी सकाळी  उघडकीस असून  या घटनेची माहीती मिळताच, भंडाराचे उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि  वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर घटनास्थळी पोहचले,
 नेमका या बछड्यांचा मृत्यू कसा झाला? याचा शोध सुरु आहे. 

२. कॉपीबहाद्दर 350 विद्यार्थ्यांवर कारवाई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन सत्र परीक्षेत जवळपास 350 विद्यार्थी गैरपक्रार करताना आढळून आलेत. यावेळी 'स्क्रीनशॉट' काढून परीक्षा देताना 350 पेक्षा अधिक विद्यार्थी निदर्शनास आलेत . त्यांच्यावर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्‍यता आहे. विद्यापीठामार्फत बहुपर्यायी  स्वरुपात ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्राच्या  परीक्षा सुरू आहेत. 

३. व्यापाऱ्यांचे 50000 कोटी बुडाले :विरेन शाह
गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनविरोधात आता व्यापारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या 40 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने काहीही करून महाराष्ट्र अनलॉक केलाच पाहिजे, अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केली आहे. 

४. काँग्रेसतर्फे 'मदतीचा एक घास
सोलापुरात काँग्रेसतर्फे  एका स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 'मदतीचा एक घास' या उपक्रमाअंतर्गत लॉकडाऊनच्या काळात सोलापूर शहरातील गरीब, बेघर, झोपडपट्टीत राहणारे गरजू आणि रस्त्यावर भाकरीसाठी वणवण फिरणारे भिक्षूक यांच्यासाठी जेवणाची सोय काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी रोजचे जेवण बनत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून अधिकच्या 10 ते 15 पोळ्या तसेच काही भाजी बनवायची, अशी संकल्पना प्रणिती शिंदे यांनी मांडली होती. 

५. रमजान ईदनिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सुचना जारी
यंदा मुस्लीम बांधवांना देखील रमजान ईद साध्या पद्धतीनं घरच्या घरीच साजरी करावी लागणार आहे. मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांना नमाज पठणासाठी एकत्र येण्यास परवानगी नाही. शिवाय इतरही काही मार्गदर्शक सूचनांचं त्यांनी पालन करणं बंधनकारक असणार आहे. 13 किंवा 14 मे 2021 ला रमजान ईद साजरी केली जाणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाने 13 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या आदेशांचे पालन रमजान ईदला करणे अनिवार्य राहील. 

६. लसीकरण केंद्राबाहेरच कार्तिकी गायकवाडने गायली गवळण
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती ठरलेली सुप्रसिद्ध पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाड हिने काल जालना येथे कोरोनावरील लस घेतली. कार्तिकीने सासर आणि माहेरच्या मंडळींसोबत लसीकरण करुन घेतले. लसीकरण केंद्राबाहेरच कार्तिकीने तिच्या प्रसिद्ध ‘घागर घेऊन निघाली.

७. ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा सवाल

“केंद्र सरकारने  सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५००० कोटी रुपये मंजूर केले. मात्र तरी देखील निधी उपलब्ध असताना देखील राज्यांवर लसीकरणाचा भार का टाकण्यात आला. तसेत केंद्र सरकारने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिले. मात्र त्यात लसीकरणासाठीच्या निधीचा उल्लेख दिसत नाही.


८. जैव-सुरक्षेच्या नियमांना भारतीय खेळाडूंचा विरोध!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी बनवण्यात आलेल्या जैव-सुरक्षा वातावरण परिघात माझ्यासह विदेशी खेळाडूंना सुरक्षित वाटायचे. परंतु काही भारतीय खेळाडूंनाच यामुळे लादण्यात आलेली बंधने मान्य नव्हती, असा खुलासा मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पॅमेंट यांनी केला आहे.

९. निवडणुका संपल्या की, इंधन दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?

"निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेल चे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की, दरवाढ ही ठरलेलीच; हे काय वित्त नियोजन आहे का?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी देशातील इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 


१०.देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 25-25 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लीटर झाली आहे. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *