Breaking News

1/breakingnews/recent

10 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद : काकाने केला पुतण्याचा खून...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES


१. अल्पवयीन भावाने केला ९ वर्षीय चुलत बहीणीवर  अत्याचार  
 कोरोनाबाधित अल्पवयीन असलेल्या चुलत भावाने फुस लावून पळवून ९ वर्षीय अल्पवायीन, चुलत बहीणीवर जंगलात नेवून बलात्कार केल्याची अतिशय धक्कादायक आणि निंदणीय घटना भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथे घडलीये. कोरोना काळातील ही घटना, परिसराला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. तक्रारीवरुन गोबरवाही पोलिसांनी आरोपिविरुद्ध गुन्हा नोंद केला असुन, आरोपी हा अल्पवयीन व कोरोनाबाधित असल्याने, पोलीसांनी त्याला त्याच्या घरीच होमक्वारंटटाईन केलेय. 

२. शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद : काकाने केला पुतण्याचा खून  
शेतीच्या हिस्सेवाटणीवरून झालेल्या वादात, काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील, रामपूर  येथे घडली. मृतक हा शेतात कामाला गेला होता, दरम्यान वाद झाला व
काठीने जोरदार प्रहार केल्याने ,पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. 

३.   खून प्रकरणातील 3 आरोपींना अटक
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, परिसरात अनैतिक संबंधातून झालेल्या, खून प्रकरणात डूगीपार पोलिसांनी तपासचक्रे गतीने फिरवून, अवघ्या 12 तासांत तिन आरोपींना ताब्यात घेवून अटक केली आहे.

४. मिलिंद चव्हाण विचार मंचातर्फे सुसज्ज कार्डिऍक ऍम्ब्युलन्स सुविधा
सध्याची कोवीड परिस्थिती आणि कोवीड रुग्णवाहिकेसाठी लोकांची होणारी परवड कमी करण्यासाठी कल्याण येथील  सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मिलिंद चव्हाण विचार मंच आणि चव्हाण प्रतिष्ठानतर्फे  'कार्डिऍक ऍम्ब्युलन्स' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार कपिल पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत या कार्डिऍक ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. 

५. मध्यवर्ती कारागृहातील आरोपी फरार
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे बंदीस्त असलेला आरोपी  शकील शेख आरेफ  याला त्याच्या मानेला गाठ आल्याने त्याला पुढील उपचारसाठी  शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी  पोलीस  स्टाफसह घेवुन गेले असताना आरोपी पोलिसांची नजर चुकवुन फरार झाला या प्रकरणी  शकील शेख आरेफ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा आरोपी

६. अपघातात दुचाकीस्वार ठार
औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर आसलेल्या वाळूज एमआयडीसीत कामगार चौकात भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. 

७. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोनावर मात
गेल्या अनेक दिवसांपासून  महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

८. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा अपघात
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ...खोपोलीच्या हद्दीमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्राँपलेन गॅस असलेला ट्रक नियंत्रण सुटल्याने जागेवरच  पलटी झालाय. हा टँकर अशापद्धतीने पलटी झाला की मुंबईकडे येणारी संपूर्ण मार्गिका बंद झालीये. 

९. कोरोना रुग्णाची गळफास लावून आत्महत्त्या
तळेगाव दाभाडे येथील एका खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात करोनावर उपाचार घेणाऱ्या एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये . रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची  मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे. 

१०. राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपात मराठा समाजाचं नुकसान
राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी अथवा त्यावर कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करून भूमिका घ्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलीये.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *