Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बुरुडगाव कचरा डेपोत भुईकाटा

No comments

  News24सह्याद्री बुरुडगाव कचरा डेपोत भुईकाटा..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. एकाच दिवशी साडेतीन हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल ३,५५३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४९१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ८४.३२ टक्के आहे.

2. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर  कारवाई
नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा दर थांबता थांबेना. असे असले तरी नगर शहरातील चितळेरोड, कोठला, रामचंद्र खुंट या भागांमध्ये दररोज सकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्कही नसतात आणि सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसतो. 

3. रेमडेसिवीर चा हिशोब लागेना
जिल्ह्यात  रेमडेसिवीर  इंजेक्शनचा तुटवडा आहे मागणी पेक्षा कितीतरी  पटींनी कमी इंजेक्शन उपलब्ध होत आहेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पद्धत निश्चित केले आहे.

4. बुरुडगाव कचरा डेपोत भुईकाटा
महापालिकेच्या कचरा डेपोत येणारी कचऱ्याची  वाहने खाजगी भुईकाट्यावरून  वजन करून घेतली जातात कचऱ्याच्या वजनावर प्रक्रियेतून खत निर्मिती प्रकल्पाच्या ठेकेदारांना बिले मिळतात या वजनातच खोटा असल्याचा आरोप होत आहे.

5. अल्पदरात भोजन देणारे फिरते अन्नछत्रालय सुरु  
लोकडॉन मुळे हातावर पोट असलेल्यायांच्या दोन वेळच्या जेवणाचा ही प्रश्न सध्या निर्माण झाला आहे याशिवाय रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांनाही बराच काळ बाहेर राहावे लागते या पार्श्वभूमीवर महावीर जयंतीच्या निमित्ताने उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकाराने फिरोदिया ट्रस्ट व आय लव नगर महावीर प्रतिष्ठान च्या वतीने महावीर जयंती दिनी फिरते अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *