Breaking News

1/breakingnews/recent

26 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - सक्तीचे विलगीकरण करा; आता ‘होम आयसोलेशन’ बंद...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES 

1. सक्तीचे विलगीकरण करा; आता ‘होम आयसोलेशन’ बंद
कोरोना लाट मोठी असल्याने कोणीही निष्काळजीपणा करू नये. ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करत घरोघर जाऊन तपासणी करा. लक्षणे आढळल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करा, होम आयसोलेशन बंद करा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या.

2. ऑक्सिजन प्लांटला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्रकल्पास भेट दिली. ऑक्सिजन निर्मितीचे तंत्र, वितरण, सिलेंडरची मागणी, पुरवठा, वीजपुरवठा व वाहतूक व्यवस्थेची माहिती त्यांनी घेतली.

३. प्राणदूताच्या भूमिकेत मंत्री गडाख पुन्हा मैदानात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव घेतल्यामुळे अनेक राजकारणी घरातच बसले आहेत. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख मात्र कोरोना रुग्णंाचे जीव वाचवण्यासाठी स्वत:ची व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता प्राणदूताच्या भूमिकेत पुन्हा मैदानात उतरले आहेत. 

४. कोविड केअर सेंटरची महसूल मंत्र्यांंकडून पाहणी
संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने विघ्नहर्ता लॉन्स येथे सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. त्यांनी कोरोना रुग्णांशी विचारपूस करत संवाद साधला

5. मदतीतून कोरोना योद्धयांना मिळते काम करण्याचे बळ
पाथर्डी  तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होतच आहे.ती रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतच आहे.आपण सर्वानी कोरोनाचे वाढते संकट आटोक्यात आण्यासाठी शासनाला सहकार्य करून आपले कर्तव्य बजावले पाहिजे.

6. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जैन बांधवांकडून प्रशासनाला सहकार्य
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी श्रीरामपूर येथे  भगवान महावीर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व भगवान महावीरांची शोभा यात्रा रद्द करण्यात येऊन केवळ विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत महावीर जयंती साजरी करण्यात आली.

7. कोविड सेंटरला १८ लाखांचे साहित्य भेट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोवीड हेल्थ केयर सेंटरसाठी आमदार आशुतोष काळे यांनी १८ लाख १० हजार रुपये किमतीचे साहित्य उपलब्ध करून दिले.
त्यामुळे आरोग्य विभागाला उपचार करताना मोठा दिलासास मीळणार आहे.

8. शेवगावात बाजरी पिकासाठी शेतकरी करतायेत कष्ट
वर्षभर विविध हंगामी पिकांची लागवड व मशागत शेतकऱ्यांकडून केली जाते. शेवगाव तालुक्यात विविध ठिकाणी उन्हाळी बाजरीचे तयार करण्याचे काम (खळे) चाललेली दिसते. बाजरी हे उन्हाळी पीक घेता येते. या उन्हाळी बाजरी पासून शेतकऱ्यांच्या बऱ्याच अशा जोडल्या गेलेल्या आहेत.

9. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोनावरील रामबाण उपाय नाही 
रेमडेसिवीर इंजेक्शन हा कोरोना संसर्गावरील रामबाण उपाय नाही. या औषधाबाबत गैरसमज निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. परिणामी बाजारात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला. 

10. कोपरगाव तालुक्याला पुरेपूर इंजेक्शनचा साठा मिळावा

कोपरगाव तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता,त्याप्रमाणात रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *