गॉसिप कल्ला - अभिनेता आस्ताद काळेचे सरकार, राजकारण्यांवर कडक ताशेरे
News24सह्याद्री - अभिनेता आस्ताद काळेचे सरकार, राजकारण्यांवर कडक ताशेरे'... पहा गॉसिप कल्ला मध्ये
कोरोनामुळे देशात हाहाःकार उडाल्यानंतर आता देशभरातून राजकारणी आणि सरकारवर टीका होताना दिसते आहे. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे याने सरकार आणि राजकारण्यांवर ताशेरे ओढले आहेत.बिग बॉस फेम आस्ताद काळेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सरकार आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे.
2. अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी,
अभिनेता अतुल परचुरे यांनी हिंदी-मराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. आपल्या विनोदी ढंगाने रसिकांचे मनं जिंकणा-या अतुल परचुरे सध्या एका कारणामुळे चर्चेत आले आहेत.छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात अतुल परचुरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाईल होळकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
3. ट्विंकल खन्नाचं एक पाऊल पुढे, थेट लंडनहून येतायंत ऑक्सिजन सिलेंडर!
ट्विंकल खन्नाने देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता सुमारे 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचे ठरविले होते. यानंतर ट्विंकल खन्नाने अधिकची माहिती दिली आहे की, त्यांच्यासोबत लंडनमधील भारतीय स्थित डॉक्टरांनी 120 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचा निर्णय घेतला आहे.
4. जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा' थिएटरनंतर ओटीटीवर
अमेझॉन प्राईम व्हिडिओने एक्शन ड्रामा 'मुंबई सागा'च्या डिजिटल प्रीमियरची घोषणा केली असून २७ एप्रिल पासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर चित्रपट पहायला मिळणार आहे. संजय गुप्ता यांच्याद्वारे दिग्दर्शित, या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी यांच्या मुख्य भूमिका असून महेश मांजरेकर, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, रोहित रॉय, अमोल गुप्ते, समीर सोनी, गुलशन ग्रोवर आणि अंजना सुखानी यांच्यासारखे दिग्गज कलाकार सोबत असणार आहे.
5. कोरोना? छे, मी तर सुट्टी एन्जॉय करतोय! मिथुन चक्रवर्ती
भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देशात रोज नवे तीन लाखांवर रूग्ण सापडत आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड सुपरस्टार व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. मात्र काही तासांतच ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झालेय. दुपारी मिथुन चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. सोशल मीडियावर ही बातमी लगेच व्हायरलही झाली.
No comments
Post a Comment