Breaking News

1/breakingnews/recent

30 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - निमगाव भोजापूर येथील मुन्नाभाईच्या दवाखान्यावर प्रांताधिकार्‍यांचा छापा...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. लाळ्या खुरकूत व घटसर्पाच्या साथीने जनावरांचा मृत्यू.
नगरमधील नेवासा तालुक्यातील पाच गावांत गेल्या आठ दिवसांपासून लाळ्या खुरकूत व घटसर्पाच्या साथीने सुमारे चाळीसपेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेनेही त्या जनावरांचे मृत्यू लाळ्या खुरकूत व घटसर्पाने झाल्याचे स्पष्ट केले.

२. खासदार सुजय विखे रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे डिवायएसपी संदीप मिटके यांच्‍याकडे 
खासदार डॅा.सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरु होती. या प्रकरणात आक्षेप घेत  सर्वसामान्यांना एकहि इंजेक्शन मिळत नसताना खासदार विखे यांना एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शन कसे मिळाले 

3. अगस्ती ने केलेले सहा लाख 11 हजार टनांचे गाळप
यंदाच्या गळीत हंगामात अगस्ति साखर कारखान्याने उद्दिष्टपूर्ती पेक्षा अधिक म्हणजेच सहा लाख अकरा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असून 30 एप्रिल नंतर अगस्ती चा पट्टा पडणार आहे.

4. कोविड  सेंटरला सर्व सुविधा पुरविणार
श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या covid सेंटर मधील रुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात... यासाठी मी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा अदीक यांनी केलेय.

५. घरोघरी जाऊन करणार करणार तपासणी
दुसऱ्या कोरोनच्या लाटीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संसर्ग थांबवण्याच्या दृष्टीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेय.

6. विलगीकरण कक्षात दाखल करणार आहेत.
कोपरगाव तालुकयातील कोरोनच्या परिस्थितीवर नियन्त्रन मिलवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने यांनी त्यांच्या संवत्सर ग्राम पंचायत आनी प्रशासकीय यंत्रनेच्या मध्यमातून 6 दिवसात गावातिल प्रतेक कुटुम्बातिल सदस्यांची तपासणी करून कोरोनाचा प्रसार थांबवण्यात जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिलवला आहे.
 
7. शिर्डी पोलिस कारवाईत 10 दिवसांत दिड लाखनचा दण्ड वसूल
शिर्डी शहरात लॉकडाउन व संचारबंदी धरतीवर शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या लोकांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. त्या माध्यमातून जवळपास दहा दिवसात दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

८. निमगाव भोजापूर येथील मुन्नाभाईच्या दवाखान्यावर प्रांताधिकार्‍यांचा छापा  
संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर प्रांताधिकार्‍यांनी छापा टाकला. त्याची चौकशी सुरू होताच या मुन्नाभाईने पलायन केले. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   
९.राहुरी फॅक्टरी येथे ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरू
कायम सामाजिक प्रश्नाची जान असणारे, समाजावर कुठलेही संकट उभे राहिले, तर पुढे जाऊन नेतृत्व करणारे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी शिवबा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आॅक्सिजनयुक्त २५ बेड असलेले कोविड सेंटर सुरू केले. 

१०. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कायम ठेवू
सहकारी साखर कारखानदारीला संकटे नवीन नाहीत मात्र आजपर्यंत आलेल्या सर्व संकटाचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच यशस्वी सामना करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका जिल्ह्यात सर्वप्रथम कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आजवर घेत आला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *