Breaking News

1/breakingnews/recent

30 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - दरेकरांवर गुन्हा दाखल करा....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES


1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी पुन्हा संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आज संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहे. राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.

2. भाजपच्या प्रवक्त्याने पुन्हा मर्यादा ओलांडली 
  उपचारासाठी बेड मिळावा यासाठी नागपुरातील 85 वर्षीय भाऊराव दाभाडकर  यांनी एका तरुणासाठी आपला बेड सोडला. त्यानंतर दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी “आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही.

3. दरेकरांवर गुन्हा दाखल करा
  मुंबई पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एस आय टी  नियुक्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली.

4. पुण्यात स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतू
  राज्यातील कोरोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. कुठे मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे, तर कुठे रुग्णांना बेडच मिळत नाहीये. पुण्यात रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने आता स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार आहे. 

5. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश होरपळतोय 
  महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने होरपळून निघत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सज्ज राहा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.

6. बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन
  तुम्ही जर स्वत:ला फिट समजत असाल तर थोडं थांबा, कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे माझी चांगली बॉडी आहे तर असं नाही. बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं.
 
7. जातीय मतभेद विसरून कोरोना काळात मदत
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. या संकटात अनेकांना जीव गमवावा लागलाय तर अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. हाताला काम नसल्यानं अनेकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता लागून राहिलीय. 

8. पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचे
पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी तीन दिवसांत राज्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलक्या  सवरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही भागांमध्ये मध्यम आणि जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

9. मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाची याचिका
पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती. आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले होते. 

10. कोवीन app वरून लसीकरणाची मोठ्या प्रमाणात नोंदणी 
करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा एक मे पासून सुरु होतोय . या लसीकरण मोहिमेमध्ये लस घेण्यासाठी  कोविन पोर्टलच्या माध्यमातून दोन दिवसांमध्ये २ कोटी २८ लाख भारतीयांनी नोंदणी केली आहे.देशभरात एकूण १५ कोटी २१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचेही मंत्रालयाने सांगितलय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *