Breaking News

1/breakingnews/recent

29 एप्रिल Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - कोविड रुग्णालयांची शहानिशा न करताच ‘ना हरकत दाखले’ दिले!........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. औरंगाबादमधील रस्त्यावर नागरिकांचा वावर वाढला..
औरंगाबाद शहरात राज्यात कोरोना वाढल्यामुळे 15 ऐप्रील रोजी लॉकडाऊन लावण्यात आला या लॉकडाऊनला नागरिकांनी भरभरुन प्रतीसाद दिला पोलिस प्रशासन हि औरंगाबाद मध्ये चौकाचौकात नाकाबंदी करुण विणाकारण फिरणार्यावर कार्यवाही करत आहेत 

2. रांजणगावातील कोविड सेंटर डॉक्टर्स व स्टॉफच्या प्रतीक्षेत
औरंगाबाद वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी येथील कोविड सेंटरला डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ देण्यास आरोग्य विभागाकडून टाळाटाळ केली जात आहेत. आरोग्य विभागाच्या या टोलवा-टोलवीमुळे कोरोना रुग्णांची मात्र हाल होत असल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक व स्थानिक लोकप्रतिनिधीकडून केला जात आहे.

3. डोंबिवलीत मास्क कारवाईसाठी गेलेल्या पथकावर तीन परप्रांतीयांनी सोडले कुत्रे !
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत बेजबाबदार नागरिकाविरोधात महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.याच दरम्यान एका गॅरेजच्या बाहेर तिघे विना मास्क आढळले या तिघांवर कारवाई करताना तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली इतकंच नव्हे तर पाळलेला कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला.कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी तायडे यांच्या पायाला दुखापत झाली आहे..

4. मुंबईत ४० खासगी लसीकरण केंद्र आज बंद
मुंबईमधील ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांमधील लसीकरण लससाठ्याअभावी गुरुवार, २९ एप्रिल रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. उर्वरित ३३ खासगी केंद्रांमध्ये मर्यादित लससाठा उपलब्ध असून दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना तेथे प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. तसेच लससाठा नसल्याने शासकीय आणि पालिकेची काही लसीकरण केंद्रे गुरुवारी बंद ठेवावी लागण्याची शक्यता आहे. 

5. कोविड रुग्णालयांना शहानिशा न करताच ‘ना हरकत दाखले’
विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटना प्रकरणात गुन्हे शाखेकडून केलेल्या चौकशीत पालिकेच्या अग्निशमन विभागाचे पितळ उघडे पडले आहे. विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विभागाने सर्वोच्च न्यायालयांच्या नियमांची पायमल्ली केली.

6. पालघर तालुका करोनाचे ‘हॉटस्पॉट’
 करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत पालघर तालुक्याने २४ तासांत रुग्णवाढीचा नवा उच्चांक गाठला असून पालघरमध्ये तब्बल ५३७ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यच्या ग्रामीण भागात आढळलेल्या ८७० नवीन रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. पालघर तालुका हा सध्या जिल्ह्यतील ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. 

7. मनोर रस्त्यावरील जड-अवजड वाहतूक महिनाभर बंद
पालघर मनोर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने मनोर बाजारपेठ भागातील ६०० मीटर अरुंद रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येत आहे. यामुळे या भागातील जड-अवजड वाहतूक  बुधवारपासून  एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रवेश बंद असणार आहे.  

8. दिल्ली आता नायब राज्यपालांची!
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी ‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा’ अधिसूचित केल्यामुळे दिल्ली आता नायब राज्यपालांच्या अधिकारकक्षेत आली. दिल्लीतील राज्य सरकारच्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या अधिकारांना कात्री लागली असून नायब राज्यपालांच्या संमतीशिवाय कोणत्याही निर्णयाची दिल्ली सरकारला अंमलबजावणी करता येणार नाही. 

9. ‘कोरोना धोरणाचा आराखडा’ देण्याचे केंद्राला निर्देश
करोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारासाठी रुग्णांची झालेली वणवण व हाल यांमुळे आता केंद्र सरकारला ‘करोना धोरणाचा सुस्पष्ट आराखडा’ मांडावा लागणार आहे. प्राणवायू व अत्यावश्यक औषधांचा पुरवठा व लसीकरण या तीन मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट करणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालाने दिले आहेत.

10. प्राणवायूसाठी केंद्राचे प्रयत्न
देशाच्या विविध राज्यांमध्ये प्राणवायूअभावी रुग्णांची झालेली वाताहात आणि या गंभीर परिस्थितीची सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी घेतलेली दखल यांमुळे केंद्र सरकारकडून प्राणवायू पुरवठा वाढवण्यासाठी युद्धपातळीवर निर्णय घेण्यात येत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *