Breaking News

1/breakingnews/recent

28 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री गेल्या 24 तासात सापडले फक्त 16 नवीन रुग्ण...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. मंगळवारी भंडारा जिल्ह्यात 1 हजार 210 रुग्ण बरे होऊन घरी परतले*
१.मंगळवारी भंडारा जिल्ह्यात  1,210 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, तर  1,127 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.  17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.65 टक्के ईतकेआहे.
भंडारा जिल्ह्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये *भंडारा तालुक्यातील 629, मोहाडी 63, तुमसर 176, पवनी 62, लाखनी 174, साकोली 58 व लाखांदुर तालुक्यातील 65 व्यक्तीचा समावेश आहे आतापर्यंत 35,768 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

2. आसामसह पूर्वोत्तर राज्य जोरदार भूकंपांनी हादरले
गुवाहाटी: आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांना आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सातच्या सुमारास सर्वात मोठा झटका बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 नोंदवली गेली. आसाममध्ये तर इमारतींनाही तडे गेले. 

3. गेल्या 24 तासात सापडले फक्त 16 नवीन रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.

4. आईच्या मृतदेहाशेजारी दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशी, कुणीही फिरकले नाही
बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबल्याची धक्कादायक घटना उघड झालेली असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये मानवतेला लाजवणारी घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आईच्या मृतदेहाशेजारी एक दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशीच बसून होता. 

5. ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी
कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत.

6. त्यांनी आपली कारही रुग्णवाहिकेसारखी वापरण्यासाठी दिलीय
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातून अनेक नकारात्मक आणि धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच या संकटकाळामध्ये प्रेरणा देणाऱ्या आणि करोनाच्या लढाईमध्ये सामान्या लोकांकडून केल्या जाणाऱ्या काही असामान्य मदतीच्या बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक बातमी गुजरातमधून समोर आली आहे. येथील एका वयस्कर दांपत्याने करोना कालावधीमध्ये करोना रुग्णांना मदत करण्यासाठी आपल्या बँकेच्या ठेवींमधील १५ लाख रुपयांची एफडी मोडली आहे. 

7. आज ४ वाजल्यापासून सुरु होणार नोंदणी!
१ मेपासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी नोंदणी करणं महत्त्वाचं आहे. ही नोंदणीप्रक्रिया आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार असल्याचं आता सरकारने हे स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरेंप्रमाणे देशाला काम करावं लागेल – खासदार संजय राऊत

८. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. 

असा विश्वास व्यक्त केला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्दतीने देशाला काम करावं लागेल असं ते म्हणाले आहेत. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

9. लग्नात उपस्थित सर्वांना अटक
ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांचा संताप झाला आणि त्यांना कारवाई केली. पश्चिम त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोनाच्या नियमांचं उल्लंघन करत सुरु असलेलं लग्न रोखलं आणि कठोर कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केल्याचा त्यांचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

10. परदेशी खेळाडू हवालदिल!
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटवरील चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक स्थगित करून खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वत: व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यामुळे परदेशी खेळाडू हवालदिल झाले आहेत. परंतु परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परतता येईल.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *