Breaking News

1/breakingnews/recent

2८ एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची 'मास्क'बाबत मोठी घोषणा....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES

1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची 'मास्क'बाबत मोठी घोषणा
कोरोनाच्या उद्रेकाला सुरुवात झाल्यानंतर त्याचा फटका ज्या देशांना सर्वाधिक बसला होता त्यामध्ये जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेचाही समावेश होता. अत्यंत बिकट आव्हानांशी मुकाबला करणाऱ्या अमेरिकेतील स्थिती आता सामान्य होऊ लागली आहे. वाढते लसीकरण हे परिस्थिती सुधारायला लागण्यामागचं मोठं कारण आहे. 

2. स्वत: कोरोना संकटात असून देखील 'हा' देश भारताच्या मदतीला
 भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरतोय. याचा परिणाम देशातल्या आरोग्य यंत्रणेवर झालाय. या संकटात जगातील अनेक देश भारताच्या मदतील आले आहेत. ऑस्ट्रेलियाने देखील भारताला मदतीचा हात पुढे केलाय. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कोरोनाविरोधातल्या युध्दात सर्वतोपरी मदतीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने व्हेंटिलेटरसह आवश्यक वस्तू भारतात पाठविल्या आहेत.

3. हवेचे प्रदूषण करणार्‍यांचा डेटा 'नासा' करणार जाहीर
प्रदूषण एक गंभीर जागतिक समस्या बनलेली आहे मग ते प्रदूषण  पाण्याचे असो किंवा हवेचे असो नासाने आता हवेच्या प्रदूषणाबाबत एक अनोखे पाऊल उचलले आहे जे कोणी हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतील त्यांची माहिती  सार्वजनिक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलय आहे त्यासाठी आवश्यक साधनांची निर्मिती नासाकडून सुरू आहे.

4. लसीकरणासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत १ मे  पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर सर्वांचे लसीकरण करण्यासह त्यात खंड न पडू देण्याचे आव्हान आहे. 

5. हायकोर्टाच्या महत्वपूर्ण सूचना
कोविड रुग्णांचे मृतदेह पाहता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना ताटकळत राहावे लागते. हे प्रकार टाळण्यासाठी स्मशानभूमीत जागा मिळत नाही तोपर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नका, असे आदेश हायकोर्टाने आज राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाला दिले. त्याचबरोबर या समस्येप्रकरणी तोडगा काढण्याच्या सूचना खंडपीठाने प्रशासनाला दिल्या.

6. सुपर 'पिंक मून'चे घडले विलोभनीय दर्शन
काल चैत्र पौर्णिमा सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय झाला मात्र ढगांच्या अडथळ्यामुळे चंद्र लवकर दिसू शकला नाही चंद्राचे आपल्यापासून सरासरी अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर इतका जास्त असता  मात्र काल त्याचे अंतर आपल्या पृथ्वीपासून हे तीन लाख 57 हजार 239 किलोमीटर इतका राहील होत  काल चंद्र नेहमीपेक्षा 26 हजार सातशे एकसष्ट किलोमीटरने जवळ आला त्यामुळे तो नेहमीपेक्षा 14% मोठा तर 31 टक्के जास्त तेजस्वी दिसत होता. 

7. केंद्र सरकार कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्यात यावा, असं मत व्यक्त केलं होत .पण आता केंद्र सरकार देशातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लाॅकडाऊन करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला असून देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर 15 टक्क्यांहून अधिक आहे. 

8. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर
मुंबई महानगर क्षेत्रात सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले.

9. आसामसह ईशान्येकडील राज्यांना भूकंपाचे धक्के; इमारतींना तडे
आसामच्या गुवाहटीसह ईशान्येकडील राज्यांमध्ये आज भूकंपाचे झटके जाणवले. 7 वाजून 51 मिनटांनी जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिक्टर स्केल वर 6.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. आसाममधील सोनितपूर भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याचं सांगितलं जात आहे. 

10. पराभवानंतर कर्णधार रिषभ पंतचे भावनिक वक्तव्य
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा युवा रिषभ पंतच्या हाती देण्यात आली आहे. ही भूमिका तो योग्यरीत्या पार पाडत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानी आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला १ धावाने पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत रिषभ पंतने भिवनिक वक्तव्य केले त्याने म्हटलंय "खरं तर मी खूप निराश आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *