25 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - कोरोना संकटाच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढे केला मदतीचा हात...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. गोंदिया जिल्हयात कोरोना काळात ५ व्हेंटिलेटर मशीन धुळ खात
राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून अनेक रुग्णांना रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याचे आपण पाहत आहोत .मात्र गोंदिया जिल्हयाच्या तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात मागील अनेक दिवसापासून ५ व्हेंटिलेटर बेड धूळ खात पडून असून हे बेड शिवसेनेचे समन्वयक श्री. पंकज यादव, यांनी शोधून काढत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच.
2. रमाकांत बन्सोड यांचे फार्महाऊस फोडून चोरांनी पाच हजार सातशे रुपयेचा ऐवज लांबवला.
औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव परिसरातील रमाकांत बनसोड यांच्या शेतातली घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याची घटना शनिवारी उगडकिस आलीय किरकोळ वस्तूंसह पाच हजार रॉक रक्कम चोरटयांनी चोरून नेल्याची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात अली आहे गंगापूर पोलीस पुढील तपास करत आहेत
3. भंडारा जिल्ह्यात शनिवारी 1 हजार 465 रुग्ण बरे होऊन घरी परतले
भंडारा जिल्ह्यात शनिवारी 1,465 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31,948 झाली असून, शनिवार ला 1,372 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43,953 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.68 टक्के आहे.प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या मार्ग दर्शक सुचना व निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
4. गणेगाव खालसा ग्रामपंचायतीकडून कोविड सेंटर सुरु
शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून 20 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे हे गणेगाव खालसा येथील तांबे कुटूंबातील पुत्र आहेत. त्यांनी गावात छोटेसे कोविड सेंटर सुरु करण्याबाबत सूचना केली होती.
5. लसीकरणासाठी "ग्लोबल टेंडर'
येत्या 1 मेपासून राज्यात 18 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, याची जबाबदारी राज्याने घ्यावी, असे केंद्र सरकार म्हणत आहे. तर, देशभरातील अन्य राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे टोलवाटोलवी न करता महाराष्ट्राने लसीसाठी 'ग्लोबल टेंडर' अर्थात जागतिक पातळीवर निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
6. शरद पवार पुन्हा रुग्णालयात; नवाब मलिक यांचं ट्विट
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
7. बिकट परिस्थितीतही मजुराचा प्रामाणिकपणा
कोरोना काळात अनेकजण स्वत:ची पोळी कशी भाजता येईल याचा विचार करत आहेत. या काळात सामान्य माणूस मात्र वेळोवेळी प्रामाणिकपणाचा प्रत्यय देत आहे. माणुसकीचा आणि प्रामाणिकतेचा प्रत्यय देणारी अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे.
8. कोरोना संकटाच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढे केला मदतीचा हात
कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या भारतभरात परिस्थिती बिकट आहे. लोक रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीत मुंबईचे डबेवालेपुढाकार घेताना दिसत आहेत. त्यांनी लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते आणि त्यांच्या या आवाहनाला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने फक्त ४ दिवसांमध्ये २० लाखांपेक्षा जास्त रक्कम एकत्र झाली.
9. गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन
ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हरेंद्र जाधव यांनी तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, आता तरी देवा मला पावशील का, माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु, पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजविले होते.
१०. विठुरायाच्या उत्पन्नामध्यें ३६ कोटींची घट
कोरोना महामारी मुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . देशाचे व राज्याचे अर्थकारण बिघडले आहे . सर्वसामान्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे . याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे . तसाच फटका पंढरपूर येथे श्री विठ्ठलाला ही बसला आहे .
No comments
Post a Comment