3 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - बेलापूर येथील व्यापाऱ्याचे अपहरण....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. बेलापूर येथील व्यापाऱ्याचे अपहरण
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे काल सोमवारी दि. १ रोजी सायंकाळी अचानक बेपत्ता झाले. या व्यापाऱ्याचे अपहरण झाले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
2. सर्वांच्या सहकार्याने कृषी विद्यापीठाचा ग्लोबल ब्रँड तयार करणार
कृषि क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या नावलौकिकाप्रमाणे या विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून सर्वांच्या सहकार्याने महात्मा फुले कृषि विद्यापीठ हा ग्लोबल ब्रँड तयार करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.
3. पाथर्डीतील 50 गावांचे पाणी अडविले
पाथर्डी तालुक्यातील 50 गावांना मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी संयुक्तिक नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिला आहे त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील 50 गावांना पाणी उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
4. वाळू तस्करांचा तलाठ्यावर हल्ला
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदी पात्र जवळील नायगाव शिवारात वाळूतस्करांनी सोमवारी रात्री तलाठ्यावर हल्ला केला.
5. पांडुरंग फुंडकर फळबाग योजना पुन्हा सुरू करा
शासनाच्या कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी रोजगार हमीतून फळबाग व पांडुरंग फुंडकर फळबाग योजना राबवली जाते योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत आहे.
6. देवगड येथे होणार रेल्वेस्थानक
औरंगाबाद पुणे रेल्वे सर्वेक्षणात सुरुवात झाली आहे. या रेल्वेमार्गाचा अंतर्गत नेवासा तालुक्यातील देवगड हे संस्थान रेल्वेमार्गाच्या नकाशावर झळकणार आहे.
7. घरफोडी करून पैसे दागिने चोरले
राहता तालुक्यातील ब्राह्मणे हनुमंत गाव येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
8. इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक
महाराष्ट्रात सर्वत्र पेट्रोल डिझेल मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पेट्रोल 100 पार पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस सध्या आक्रमक होताना दिसत आहे.
9. पालिकेच्या च्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त
नगरपरिषदेने गेल्या दोन महिन्यापूर्वी लेखी आश्वासन देऊन आठ दिवसात शहरातील मुतारी चे काम सुरू होईल असे आश्वासन देऊनही दोन महिने उलटून मुतारी चे काम सुरू न झाल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे व अमोल गरजे यांनी प्रतीकात्मक मुतारी तयार करून शहरातून वाजत-गाजत तिची मिरवणूक काढण्यात आली.
10. माय लेकीचे धाडस ट्रांसफार्मर जाळण्यापासून वाचविला
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील अचानक झालेल्या पाऊस वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विद्युत वाहक तारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत वितरण कंपनीने काही दिवसापासून वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावरून ट्रांसफार्मर बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
Tags:
No comments
Post a Comment