Breaking News

1/breakingnews/recent

23 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - पुणे पालिकेला बेड देण्यास खासगी हॉस्पिटलचा नकार..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. मेरा रंग दे बसंती चोला.हसत-हसत फाशीवर चढणाऱ्या शहीद वीरांना अभिवादन
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. 23 मार्च आणि हा दिवस इतिहासात या शहिदांच्या नावे कोरला गेलाय. 

2. आम्ही जिजाऊ अन् सावित्रीच्या लेकी, शिवसेना खासदाराला सुनावलं
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या, पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांची बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशा घटनांच्या मालिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. 

3. अनिल देशमुखांकडून 'सर्वोच्च' लढाईसाठी मोर्चेबांधणी; ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त खलबतं
 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहयांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सध्या अनिल देशमुखांकडून कायदेशीर बाबींचा अंदाज घेतला जात आहे. 

4. अमृता फडणवीस यांचं भाई जगतापांना थेट प्रत्युत्तर!
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट्स अ‍ॅक्सिस बँकेत वळविल्यावरून माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. 

5. ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदलाची चिन्हं
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. 

6. तब्बल दीड लाखांची लाच घेताना अप्पर तहसीलदाराला रंगेहाथ पकडले

जालना जिल्ह्यात दीड लाखाची लाच घेताना अप्पर तहसीलदार रंगेहात अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रॉयल्टी पावतीच्या सत्यापणासाठी 3 लाख 20 हजार तर वाळू वाहतुकीसाठी दर महिना दीड लाखाची मागणी होती.


7. 'फाटके कपडे घालणे म्हणजे अपशकुन'

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांच्या फाटलेल्या जीन्स वक्तव्यावर देशभरातून जोरदार टीका होत आहे. यातच मध्यप्रदेशच्या पर्यटन मंत्री उषा ठाकुर यांनी तीरथ सिंह रावत यांच्या सुरात सुर मिसळला आहे. भारतीय संस्कृतीत फाटलेले कपडे घालने म्हणजे अपशकुन मानले जाते असे ठाकुर म्हणाल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरणा आता आणखी राजकारण होण्याची शक्यता आहे.


8. पुणे पालिकेला बेड देण्यास खासगी हॉस्पिटलचा नकार
शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने शहरात खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना बेड मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीनं सोमवारी खासगी हॉस्पिटलची बैठक घेतली.

9. '18 वर्षांपुढील सर्वांना लसीकरणास मुभा द्या'
शहरात सातत्याने वाढत असलेली करोना बाधितांची संख्या लक्षात घेता, 18 वर्षांपुढील व्यक्तींना करोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केली आहे. 

10. दुखापत झाली असतानाही पायावर पट्टी बांधून सचिनने खेळली फायनल
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मधील अंतिम सामना भारतीय लिजेंड्स आणि श्रीलंकन लिजेंड्स यांच्यात पार पडला. या सामन्यात भारतीय लिजेंड्स संघाने १४ धावांनी विजय मिळवला. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *