2 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. भाजपच्या आरोपाने खळबळ
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोनाकाळातील साहित्य खरेदीत तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केलाय.
2. रेल्वेनं ठराविक स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट 5 पटीनं वाढवलं!
मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवलं आहे.
3. कार्तिक आर्यनच्या आगामी 'धमाका' चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज
धमाका' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
4. खासदार चिखलीकरांची नांदेड जिल्हा बँकेसाठी उमेदवारी
नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) सर्व प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
5. माळीणच्या धर्तीवर घुटके गावचे पुनर्वसन
भूस्खलनाचा धोका असलेल्या मुळशी तालुक्यातील घुटके गावाचे पूर्णत: पुनर्वसन करण्यात येणार आहे. पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. माळीण गावच्या धर्तीवर घुटके गावचे पुनर्वसन केले जाणार आहे.
6. विशेष न्यायालयात दाद मागण्यास मुदत
बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे.
7. टीआरपी घोटाळ्यातील मास्टरमाईंड पार्थोदास गुप्ताला जामीन मंजूर
टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी मध्यंतरी भांडाफोड केला. या टीआरपी घोटाळ्यातील मुख्य आरोपी पार्थोदास गुप्ता याला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
८. सिमेंट चोरी प्रकरणी एकास अटक; गस्त घालत असताना केली कारवाई.
अकोल्यातील खदान पोलिस हे सोमवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना एका आटोमध्ये सिमेंटचे पोते, व टाईल्स घेवुन जात असल्याचे दिसले. खदान पोलिसांनी आटो चालकाची चौकशी केली असता चालकाकडे काहीच उत्तर नसल्याने पोलिसांनी अटक केली.
9. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली कोरोना लस
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या दिवशी आज कोरोना लस घेतली.
10. निष्पर्ण झालेल्या पळसाच्या झाडांवर फुलांचा उत्सव सुरू
होळीची चाहूल लागताच रानमोळी निष्पर्ण झालेल्या पळसाच्या झाडांवर फुलांचा असा उत्सव सुरू होतो.सध्या अकोला जिल्ह्यातील शेतशिवारात पळसाची झाडे अशी फुललेली दिसू लागली आहेत.
No comments
Post a Comment