Breaking News

1/breakingnews/recent

१ मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

   News24सह्याद्री -  अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर आतंकवादी हल्ला पोलीसांकडून मॉकड्रील सादरीकरण...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES

1. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात
आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपाल मराठीमध्ये केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले की, राज्य सरकार कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. 

2. वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीसांची जुंपली
 विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. 

3. अध्यक्षपदाची पुढील निवडणूक लढणवण्याचे संकेत
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सोडल्यानंतर प्रथमच जाहीर कार्यक्रमात सहभाग घेतला. ट्रम्प यांनी या कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

4. 'फोन पे'चे पोस्टर मराठीत करा; मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा
कोथरूड - शहरात इतर भाषेत असलेले 'फोन पे' चे पोस्टर मराठी भाषेत करावे. येत्या पंधरा दिवसात हा बदल करावा, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे शहर विभागाकडून देण्यात आले.

5. जास्तीत जास्त लोकांना स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा देण्याचा प्रयत्न
येत्या दोन वर्षांमध्ये देशात स्वयंपाकाच्या गॅसच्या आणखी १ कोटी मोफत जोडण्या दिल्या जाणार असून, जास्तीत जास्त लोकांना स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तेल सचिवांनी म्हटले आहे..

6. निर्बंध पाळून कुंभमेळा
करोना काळातही हरिद्वारमधील कुंभमेळा १ एप्रिलपासून २८ दिवसांच्या कालावधीसाठी होणार असून त्यासाठी प्रमाणित संचालन पद्धतींचा अवलंब करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यास येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाकडे आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल असणे बंधनकारक आहे.

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
आत्मनिर्भर भारत हा केवळ सरकारच्या धोरणाचा भाग नसून तो  राष्ट्रीय भावना व जिद्दीचा भाग आहे. स्वयंपूर्ण भारताचा हा मंत्र आता देशातील खेडय़ापाडय़ात पोहोचत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले.

८. अकोल्यामध्ये गर्दीचे ठिकाण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावर आज सकाळी आतंकवादी हल्ला झाला.

या हल्ल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच त्यांनी बसमधील नागरिकांची सुटका केली.असा प्रसंग झाला तर दहशतवाद विरोधी पथक कशाप्रकारे तोंड देईल याची रंगीत तालीम दहशतवाद विरोधी पथकाने केली. दरम्यान, पोलिसांची ही मॉंकड्रिल पाहून पोलिस किती जोखमीने नागरिकांचे प्राण वाचवितात, हे दृश्य पहावयास मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर निर्माण झाला. 

9. घराणेशाहीमुळे काँग्रेसची दुर्गती – अमित शहा
घराणेशाहीच्या राजकारणामुळे काँग्रेस देशभरात रसातळाला जात आहे, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

१०. चोरट्यांकडून नऊ दुचाकी केल्या जप्त.
 दुचाकी चोरीच्या माहितीवरून रामदास पेठ पोलिसांनी आज अकोल्यात पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त केली आहे. या पाच जणांकडून आणखी दुचाकी चोरीचे प्रकरण समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रामदास पेठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी शुभम मार्गे यास ताब्यात घेतले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *