जिल्ह्याची खबरबात - खर्डा येथे आ रोहीत पवार विचार मंच्याची स्थापना
News24सह्याद्री - खर्डा येथे आ रोहीत पवार विचार मंच्याची स्थापना...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. शेतीपंपाचा विजपुरवठा बंद केल्याने महावितरण विरोधात मनसे आक्रमक
पारनेर तालुक्यात सर्व शेतीपंपाचा विजपुरवठा बंद केल्याने महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतातील उभ्या पिकाने माना टाकल्या असून सुपा गटातील शेतकर्यांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्मान सेना पारनेर तालुक्याच्या वतीने सहकार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डी.एन.साबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांची पिळवणूक व अन्याया विरुद्ध लढण्यासाठी येत्या दोन दिवसात महाराष्ट्र नवनिर्मानसेनेच्या वतीने महावितरण कंपनी ला अल्टीमेंटम देण्यात आले होते.
2. नगर परिषदेच्या वतीने दिंडीचे उत्स्फुर्तपणे स्वागत
शेवगाव येथे स्वच्छ कर्जत अभियानांतर्गत कर्जत ते पैठण पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल दिंडीचे शेवगाव शहरात स्वागत करण्यात आले.
3. खर्डा येथे आ रोहीत पवार विचार मंच्याची स्थापना
जामखेड तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांची गाव स्वच्छता अभियानाची संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन खर्डा येथील पत्रकार तथा सामाजिक कामाची आवड असणारे समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणजे दत्तराज पवार यांच्या पुढाकाराने खर्डा येथे आ रोहीत पवार विचार मंच्याची स्थापना करण्यात आली
4. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण
कोपरगाव तालुक्यातील डाऊच आणि जेऊर कुंभारी भागातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज दिनांक 1 मार्च रोजी कोपरगाव वीज वितरण कार्यालय गाठून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
5. भगवानगड - नगर - परळ - मुंबई बस सुरू
महाराष्टातील लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेञ भगवानगड संत भगवानबाबा महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी व भगवानगड पर्यटन विकास पाहण्यासाठी मुंबई आगार येथुन मुंबई परळ अहमदनगर पाथर्डी भगवानगड अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे.
6. गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील पाणीपट्टी माफ करावी
वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली बंद केलेली आहेत तर दुसरीकडे जलसंपदा विभाग अधिक थकित पाणीपट्टी मगच पाटपाण्याचे नियोजन करू असे सांगत आहे
7. मढीचा पाणीप्रश्न सुटणार
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील गावासह देवस्थान साठी उपयुक्त ठरणाऱ्या पाझर तलावाची गळती थांबून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे.
8. निबंध व पोस्टर स्पर्धेतून एड्स जनजागृती
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी जिल्हा रुग्णालय अहमदनगर नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास येथील श्री नुर्सिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमांतर्गत एड्स जनजागृती वर निबंध पोस्टर स्पर्धा घेण्यात आली
9. संगमनेर येथे आढळले जिवंत पुरुष जातीचे अभ्रक
अवघ्या एक दिवसाचं जिवंत पुरुष जातीचे अभ्रक संगमनेर तालुक्यात समनापुर च्या जेडगुले वस्ती या ठिकाणी सापडले त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
10. कोपरगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना
ठोठावला
दंड
माहितीच्या अधिकारात माहिती मागून देखील माहिती न देणाऱ्या दोन ग्रामसेवकांना नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी कोपरगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना दंड ठोठावला आहे.
No comments
Post a Comment