गॉसिप कल्ला - श्रुती मराठेने शेअर केलं हटके फोटोशूट

News24सह्याद्री - श्रुती मराठेने शेअर केलं हटके फोटोशूट... पहा गॉसिप कल्ला मध्ये
1. अनुष्काने शेअर केला खास फोटो
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या घरी जानेवारीमध्ये एक छोटी पाहुणी आली आहे. आई झाल्यानंतर अनुष्का पहिल्यांदा घराबाहेर गेलीय. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला नुकताच एक फोटो शेअर केलाय.
2. ‘फिल्मफेअरची ब्लॅक लेडी महेश कोठारेंच्या हातात
नुकताच मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला. यात अनेक मराठी चित्रपटांनी, कलाकारांनी विविध विभागांसाठी पुरस्कार जिंकले. दरम्यान महेश कोठारे यांना ‘Excellence in Marathi Cinema’साठी फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.
३. श्रुती मराठेने शेअर केलं हटके फोटोशूट
अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. श्रुतीने तिचे व्हाईट साडीमधलं फोटोशूट शेअर करुन सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती एका वेगळ्या लूकमध्ये दिसतेय.
4. मृणाल दुसानीसने शेअर केला पतीसोबतचा फोटो
अभिनेत्री मृणाल दुसानीस सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
5. जान्हवी कपूरच्या आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर एक चांगली डान्सर म्हणून ओळखली जाते. मात्र, जान्हवी ‘रुही’ चित्रपटात पहिल्यांदाच एक आयटम साँगवर करताना दिसत आहे. रुही चित्रपटातील नदियों पार या आयटम साँगवर जान्हवीने जबरदस्त डान्स केला आहे.
No comments
Post a Comment