15 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - राहता जिल्ह्यात दिवसाआड आढळतात मृतदेह....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. माजी केंद्रीय मंत्री पवारांकडे सभापती गायकवाडांची मागणी
आखाती देशांसह इतर देशांमध्ये कंटेनरच्या माध्यमातून कांदा निर्यात करण्यासाठी कंटेनर मिळत नसल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात साठी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी रविवारी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे..
2. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकरुखे गाव 3 दिवस बंद राहणार
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून याला रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे.
3. ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या आगीत जाळून खाक
ऊस तोडणी कामगारांच्या अड्ड्यातील तीन झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरातील घुलेवाडी रोडवर ऊस तोडणी कामगारांचा मोठा अड्डा आहे.
4. घारगाव पोलिस स्टेशन मधील दुचाकींचा होणार जाहीर लिलाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील पोलिस स्टेशनच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस पडून असलेल्या दुचाकींचा जाहीर लिलाव मंगळवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे.
5. जिल्ह्यात दिवसाआड आढळतायत मृतदेह
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मृतदेह आढळून आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घातपात करून हे मृतदेह फेकण्यात आले असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
6. शिरेगाव सेवा सोसायटी जाळण्याचा प्रयत्न
नेवासे तालुक्यातील शिरेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्यरात्री पेटवण्याचा प्रयत्न झाला.
सोनई-शिरेगाव रोड लगत सेवा सोसायटीची इमारत आहे.रोड लगत असणाऱ्या खिडकीची काच फोडून एका लांब तारेला सुतळी धागे गुंडाळून त्यावर पेट्रोल टाकून आतील बाजूस असणारे संगणक, सीपीयू, तसेच सेवा संस्थेच्या महत्त्वाच्या फाईल पेटवण्याचा उद्देश होता.
7. 67 हजारांचा ऐवज लंपास
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला याप्रकरणी ज्ञानेश्वर साहेबराव गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
8. पावणे चार लाखांच्या दारू वर चोरट्यांचा डल्ला
राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग असलेल्या पुणतांबा फाटा चौफुलीवर वर्दळीच्या ठिकाणच्या देशी दारू दुकानाचे शटर तोडून तीन लाख 75 हजार चारशे दहा रुपये किमतीचे देशी दारूचे सुमारे 173 बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लांबविलीयांची घटना घडली दारू वरच डल्ला मारण्याची ही तालुक्यातील दुसरी घटना आहे.
9. काकडी , कैरी, भेंडी, लिंबूला, मागणी वाढली
उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची आवक कमी झाली आहे त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दरात मात्र घसरण झाली काकडी कैरी लिंबू भेंडी कारले दोडके गवारीला मागणी वाढल्याने त्यांचे दरही कडाडले आहेत.
10. नागरदेवळे येथे नगरपालिका करू
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले नागरदेवळे विकासापासून अद्यापही दूर आहे मागील पंधरा वर्षात येथील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे या परिसरातील गावांची ही तशी स्थिती आहे.
No comments
Post a Comment