Breaking News

1/breakingnews/recent

12 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

      News24सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिश्किल टिप्पणी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. वैयक्तिक लाभाच्या योजनांनपासून विद्यार्थी वंचित
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील वैयक्तिक लाभाच्या बारा योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

2. राहुल गांधींची टीका
देशात आताच्या घडीला बेरोजगारी हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. 

3. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात स्वाभिमानी आक्रमक,
महाविकास आघाडी सरकारपुढील अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचा मित्रपक्ष असेलल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. 

4. नगरसेविकेने स्वत:चे जनसंपर्क कार्यालय पाडले
दत्तनगर चौकात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने येथील रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याकरिता मिळकतधाराकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 

5. राज्य सरकारला मदतीचा धनादेश देत प्राध्यापकाचा नवा आदर्श
अभियांत्रिकी शिक्षणात नावलौकिक असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे अर्थात 'सीओईपी'तील प्राध्यापक यशवंत कोळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तब्बल साडेचार लाख रुपयांची आर्थिक मदत केली. वेतनास दिरंगाई झाल्यास आकाडतांडव करणारे प्राध्यापक दिसतात. 

6. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता.

7. कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळीच दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला साथ द्यावी, असे आवाहन करतानाच कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

8. पश्चिम महाराष्ट्रातील नेते मला टार्गेट करतायत भाजपआमदार प्रशांत बंब
पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांनी मला लक्ष्य करण्यासाठी गंगापूर साखर कारखान्याच्या घोटाळ्यात गोवले, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब  यांनी केला. 

9. अकोला जिल्ह्यात आज रात्री 8 वाजता पासून सोमवारी सकाळ पर्यंत कडक लॉकडाउन
अकोला जिल्ह्यात आज रात्री 8 वाजता पासून सोमवारी सकाळ पर्यंत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे.अकोला जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता, अकोला जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री 8 वाजता पाहून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक लॉक डाउनची घोषणा केली आहे. 

10. "अमेरिका या सर्वात कठीण काळावर मात करेल"
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे सर्व जगात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की, या देशाने सामूहिक बलिदान दिले आहे. या रोगामुळे निर्माण झालेल्या “सर्वात कठीण आणि गडद काळावर” अमेरिका मात करेल, असेही त्यांनी नमूद केले.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *