1४ मार्च Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - शेत शिवारात आढळला अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती.
2. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले कडक लॉकडाऊनचे संकेत
गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग वेगाने वाढत आहे.
3. शेत शिवारात आढळला अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या यावलखेड गुडधी शेत शिवारामध्ये एका 20 वर्षीय अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
4. औरंगाबाद मध्ये ११ मार्च ते ४ एप्रिल
लॉकडाऊन
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले असून, औरंगाबाद शहर व तालुक्यात ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यत अंशत.लाॅकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहेत.
5. चोपड्यात दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यु
मागील काही दिवसांपासून चोपडा तालुक्यात कोरोनाचा रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चोपडा तालुक्यात 13 मार्च व 14 मार्च म्हणजे शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
6. खान्देश सुपूत्राला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार
शिरपूर चे तहसीलदार आबा महाजन हे तहसीलदार पदासारखी मोठी जबाबदारी सांभाळत असतांना देखील मिळालेल्या वेळेत नानातऱ्हेच्या लिखाणात व वाचनात भर देतात
7. औरंगाबाद मध्ये लॉकडाऊनचे पालन
औरंगाबाद वाळूज परिसरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुर्ण लॉकडाऊनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या लॉकडाऊनमध्ये कारखाने सुरु असले तरी बरेसचे कंत्राटी कामगारांनी सुट्टी घेऊन घरीच राहिले. लॉकडाऊनमुळे परिसरातील बाजारपेठा बंद असल्याने रस्त्यावर नागरिक व वाहनांची तुरळक गर्दी दिसून आली.
8. डोंबिवलीत सायंकाळी सात वाजता दुकाने बंद
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी दुकानांवर काही निर्बंध घातले आहेत. यामध्ये किराणा मालाचे दुकाने हे सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत व हॉटेल व बार ला रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
9. डोंबिवलीत रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरू मालकावर गुन्हा दाखल
डोंबिवलीत मध्यरात्री उशिरा पर्यंत इगो डान्स बार सुरु असल्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी अखेर बारमालक अशोक पुरुषोत्तम पंडा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
10. राज्यात दिवसभरात 15 हजार 602 कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला आहे. अशातच राज्यात काल दिवसभरात 15 हजार 602 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या ही पंधराशेच्यावर आहे.
No comments
Post a Comment