Breaking News

1/breakingnews/recent

पूजाच्या आई-वडिलांना राठोड यांनी पाच कोटी रुपये दिले; त्यामुळेच त्यांना हत्येविषयी काही बोलायचे नाही

No comments




मुंबई -

पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्याप्रकरणावरून राजकारण तापलं आहे. आत्महत्या करून २० दिवस होत आले आहे. त्या प्रकरणाशी संबधित मंत्री संजय राठोड यांनी काल(दि.२८) राजीनामा दिला आहे. पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेऊन, या प्रकरणात लक्ष घालावे आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहे. अशी भूमिका पूजा चव्हाण यांच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी आज(दि.१) पोलिस आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे.

पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले आहे. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही असा आरोपही यावेळी बोलताना पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी शांताबाई राठोड म्हणाल्या की, पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई वडील अद्यापही काही बोलत नाही. त्या दोघांना संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये देण्यात आले असून त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे. तसेच, मी या प्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जीवालाही धोका आहे. असेही शांताबाई राठोड म्हणाल्या.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *