Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड

No comments

 News24सह्याद्री कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड...पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड
धार्मिकस्थळी आणि सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. 

२. काँग्रेसमध्ये इन्कमिंग व भाजपला गळती  
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे केडगाव मंडल अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या संजय भिंगारदिवे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय. 

3. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने नगरच्या कलाकारांचा सन्मान 
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर  शहरात सुरू असणाऱ्या व महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिका तुझ माझ जमतय यातील कलावंतांचा सत्कार मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने करण्यात आलाय.  

4. भिंगार परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य 
भिंगारमध्ये बिकट बनलेला पाणीप्रश्न तात्काळ सोडवा अशी मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आलीय.  या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आलय. 

५. राष्ट्रवादीचे चूल मांडा आंदोलन 
फेब्रुवारी महिन्यात सलग तीन वेळा झालेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात चूल मांडा आंदोलन करण्यात आलय. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *