10 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - गुरु शुक्राचार्य मंदिरातील महाशिवरात्री उत्सव रद्द....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण (राहाता )
गेल्या आठ दिवसांपासून राहाता शहर आणि परिसरात जनावरांना लंम्पि या आजाराने त्रस्त केले आहे. या आजारामुळे जनावरांच्या अंगावर फोड येऊन ते फुटतात त्यामुळे जनावरे चारादेखील खात नाहीत,अन्नपाण्यावाचून हि जनावरे तडफडत आहेत.
2. राहुरी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी राहुरी तालुक्यातील पूर्व भागात मुळा नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्याचा निर्णय घेत राहुरी तहसीलदार फसिउद्दीन शेख यांना आदेश काढलेत.
3. आत्महत्येचा प्रयत्न करणारा भिशी चालक कायद्याच्या जाळ्यात
गेल्या काही दिवसांपासून महसूल मंत्र्यांच्या तालुका संगमनेर विविध विषयांनी चर्चेत आहे. यातच शहरातील भिशी प्रकरण चांगलेच गाजले आहे.
4. हार्वेस्टर चालकांकडून दडपशाही करत बळीराजाची लूट
राहुरी तालुक्यात गहू सोंगणीचा हंगाम जवळ येत असताना तालुक्यात हार्वेस्टर चालकांची धावपळ सगळीकडे दिसून येत आहे.
5. गुरु शुक्राचार्य मंदिरातील महाशिवरात्री उत्सव रद्द
कोपरगाव शहरातील श्री कोपरगाव बेट देवस्थानच्या सद्गुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे साजरा होणारा महाशिवरात्री उत्सव या वर्षीही चांगल्या प्रकारे साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली होती, मात्र कोरोना महामारीमुळे यंदाचा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्यात आला आहे.
6. शनिशिंगणापुरातील शनिअमावास्या रद्द
संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना स्थिती लक्षात घेऊन शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवून अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.
७. अगस्ती महाविद्यालयाला आग
अकोले तालुका एड्युकेशन सोसायटीचे कला,वाणिज्य अगस्ती महाविद्यालयाला मंगळवारी रात्री अचानक आग लागली,पहाटे एका व्यक्तीने कॉलेजमध्ये प्रचंड धुराचे लोट पाहिल्याने त्याने तातडीने प्रशासनाला याची खबर दिलीय आणि सकाळी मोठ्या शिताफीने हि आग विझविण्यात आली.
8. नगर जिल्ह्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे
नगर शहर व जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण सातत्याने वाढत असून आता नगर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. दरम्यान दिवसभरात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला.
9. जिलेटीनच्या सहाय्याने २५ बोटी केल्या नष्ट
श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार आणि बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांचे अधिपत्याखाली महसूल पथकाने सलग दोन दिवस अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई करत वडगाव शिंदोडी मधून ४ बोटी, म्हसे मधील ८ बोटी तसेच माठ मधील १३ बोटी अशा २५ बोटी जिलेटीन च्या सहाय्याने स्फोट घडवून नष्ट केल्या.
10. ‘कुकडी’चे आवर्तन दोन दिवस वाढवले : शेलार |
कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू होते. श्रीगोंदे तालुक्यातील लाभ क्षेत्रातील पिकांसाठी नऊ दिवस कालावधी होता. |
No comments
Post a Comment