Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - गोळी झाडून युवकाची आत्महत्या

No comments

        News24सह्याद्री - गोळी झाडून युवकाची आत्महत्या...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


1. संत महंत रस्त्यावर उतरतील
लोकडाऊन च्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन-प्रवचन वगळता सर्व काही अगदी पद्धतशीर सुरु आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय संपविण्याचा डाव कोणी टाकला आहे.

2. कानिफनाथांची समाधी असलेल्या गावात पाच दिवस प्रवेश बंदी
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी कानिफनाथ समाधी मंदिरासह गावांमध्ये भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
  
3. अखेर शेवगावच्या आठवडे बाजाराचा पेच मिटला
खासगी जागेत भरणाऱ्या शेवगावच्या आठवडेबाजाराच्या स्थलांतराचा अखेर पेच मिटला असून लवकरच नवीन जागेत स्थलांतर करण्यात येणार आहे. 

4. गोळी झाडून युवकाची आत्महत्या
नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील उद्धव राजेंद्र ठोंबरे या 24 वर्षीय  युवकाने गावठी कट्टाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
 
5. शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान  
शेवगाव येथील ठाकूर निमगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 220 केव्ही अमरापूर ते थाप्तीतांडा अती  उच्च दाब विद्युत वाहिनी चे काम सुरू असून ठाकूर निमगाव येथील  शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना न देता त्यांच्या शेतामधून ट्रॅक्टर घालून तारी पसरवण्यात आल्या यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

6. सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज
मंदिर बंद कोपरगाव शहरातील बेट या ठिकाणी जगातील एकमेव मंदिर असलेल्या परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिराचा सर्वात मोठा धार्मिक व वार्षिक उत्सव महाशिवरात्री आज असून सालाबाद प्रमाणे यावर्षी चा उत्सव सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरविले होते.

7. विषारी औषध पिऊन विवाहितेचे आत्महत्या
अकोले तालुक्यातील वीरगाव येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. वीरगाव येथील रहिवसी विजय सुधाकर कदम यांची पत्नी योगिता विजय कदम या यांनी विषारी औषध सेवन केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 
  
8. वाळकीत अनेक गायांचा मृत्यू  
राहता तालुक्यातल्या वाळकी गावात अज्ञात रोगण शेतकऱ्यांची जनावरे दगावत असल्याचे  धक्कादायक प्रकार समोर येत आहेत 

9. अतिक्रमण धारकांवर पालिकेची कारवाई
जिल्ह्यातील अतिक्रमणाचा मुद्दा हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. मात्र अशा अतिक्रमणधारकांनावर कारवाई करून रस्ता मोकळा करण्याचे काम पालिका प्रशासनाला करावे लागत असते नुकतेच श्रीरामपुर शहरातील संगमनेर रोड नेवासा रोडवर अतिक्रमणे झाली आहेत.

10. स्कॉर्पिओ चोरणाऱ्यास पोलिसांकडून अटक
चोरीला गेलेली  साडेचार लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीसह ताब्यात घेतली आहे  14 डिसेंबर 20२०  रोजी  हि स्कॉर्पिओ श्रीगोंदा शहरांमधून चोरीला गेली होती सदर गाडी  महिंद्र महानोर  याने चोरल्याचा संशय असल्यामुळे  त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *