11 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. एमपीएससी परीक्षा पुन्हा लांबणीवर, मुलांच्या डोळ्यात अश्रू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर गेल्याने पूर्वतयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली. सांगलीतील शासकीय अभ्यासिकेतील अनेक मुलींच्या डोळ्यातून या वृत्ताने अश्रू वाहू लागले.
2. रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली जाहीर
कोकणातील शिमगा म्हणजे चाकरमान्यांच्या हृदयातला हळवा कोपरा. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणेशोत्सवासाठी अवश्य गावाला जातो.
3. शरद पवार आणि हार्दिक पटेल यांची मुंबईत भेट
गुजरातमधील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर आता गुजरातचे काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि युवा नेते हार्दिक पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारयांची भेट घेतली.
4. चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त
चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त करण्यात आली. नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. भर्रेंच्या घरातून 100 पेटी दारु जप्त झाल्याचं वृत्त पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे.
5. मराठा आरक्षणावरुन उदयनराजे कडाडले
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजामध्ये मोठी अस्वस्थता आहे. आरक्षणाला घेऊन विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. आता याच मुद्द्यावर बोलताना आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार अशा कठोर शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.
6. सरकारच्या निर्णयाचा निषेध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
7. निर्णय मागे घेण्यासाठी काँग्रेसचा सरकारवर दबाव
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC ची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेलीय. 14 मार्चला होणारी ही परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
8. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती नियंत्रित करून 1500 पर्यंत कमी होणार
राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोबर, 2020 ते जानेवारी 2021 या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, 2021 च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे 10,000 नवीन रुग्ण वाढत आहेत.
9. पुणे-जबलपूर-पुणे विशेष गाडीला मुदतवाढ
रेल्वेने पुणे-जबलपूर-पुणे विशेष गाडीला मुदतवाढ दिली असून, ही गाडी येत्या 29 जूनपर्यंत धावणार आहे.
रेल्वेची नियमित प्रवासी सेवा अद्यापही स्थगित असल्याने अनलॉकपासून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.
10. पंतप्रधानांनी ट्विट करून दिली माहिती
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिरा बेन यांनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली. यापूर्वी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय इतरही अनेक नेत्यांनी कोरोना लस
No comments
Post a Comment