Breaking News

1/breakingnews/recent

25 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

         News24सह्याद्री - सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. भारत आणि पाकिस्तानमध्ये महत्वाचा करार
भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला असून दोन्ही देशाच्या लष्करांनी जम्मू आणि काश्मीरमधील तसंच इतर परिसरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे.

2. मूडीजने वर्तवला २०२२ वित्तीय वर्षासाठीचा अंदाज
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशावर निर्माण झालेले आर्थिक मंदीचे सावट हळूहळू दूर होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे पुन्हा सुरू झाल्याने देशाची आर्थिक गाडी पूर्वपदावर येत आहे. कोविड -१९ साठीच्या लसीकरणामुळे बाजारात आत्मविश्वास वाढतो आहे. 

3. सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार
सोशल मीडियाचा होणारा वापर आणि गैरवापर या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणार चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जात असल्याच्या देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. 

4. पाकिस्तानी खासदाराने मागितली हिंदू समाजाची माफी
पाकिस्तानात सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला हिंदू समाजाची माफी मागावी लागली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्ष सत्तेवर आहे. 

5. नथुराम गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेणाऱ्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पार पडला. 

6. बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला आणि वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजप प्रचंड जोमाने कामाला लागली आहे. 

7. मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला
कोरोना नियमावलीवरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्याचं कळतंय. 

8. राज ठाकरेंना शिवसेनेचा धक्का
 दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील नूतनीकरणाचे काम सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या  माध्यमातून करण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे   यांचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने फेटाळला आहे. महापालिकेने गुरुवारी या कामाच्या निविदेची जाहिरात वृत्तपत्रात दिली. 

9. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणे अशक्य?
  मार्च महिन्यातील 1 तारखेला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  विधानसभेच्या अध्यक्षपदाची  निवड होण्याची शक्यता धुसर आहे. राज्यात वाढलेला कोरोना संसर्ग तसेच मंत्री आणि आमदार यांना कोरोनाची झालेली लागण यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे

10. नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ
 नवी मुंबई महापालिका निवडणूक  मतदार याद्यांवर साडेतीन हजार हरकती आल्या. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्याचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. तर अनेक मोठमोठे घोटाळे मतदार यादीत करण्यात आल्याचे समोर आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *