शहराची खबरबात - कोरोणा मुळे मनपा सभापतीपदाची निवडणूक होऊ शकेल का?
News24सह्याद्री - कोरोणा मुळे मनपा सभापतीपदाची निवडणूक होऊ शकेल का?....पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. आता बाजारपेठेतही कारवाईचा बडगा
बाजारपेठासह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
2. विडी कामगारांचा संप
केंद्र सरकारने 2003 च्या कोटपा कायद्यात दुरुस्ती करून बिडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा बिडी कामगार युनियन महाराष्ट्र राज्य बिडी कामगार ; फेडरेशन इंटक कामगार संघटना व महाराष्ट्र बीड उद्योग संघाच्यावतीने आज एकदिवशीय बिडी कारखाने बंद ठेवून संप
3. कोरणा मुळे मनपा सभापतीपदाची निवडणूक होऊ शकेल का ?
कोपरोनाचे वाढते रुग्ण आणि त्यामुळे प्रशासनाकडून घेण्यात येणारी दक्षता पाहता जाहीर झालेली महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होईल का अशी शंका उपस्थित केली जात आहे मात्र महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी 4 मार्चला निवडणूक जाहीर झालेली आहे.
4. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नगर जिल्हा प्रथम
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी संवर्गात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यात प्राप्त झाला.
5. खबरदारी घेऊन सभा सभागृहात घेणे शक्य
जिल्हा परिषदेत 26 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा होत आहे सभेसमोर 40 विषय असल्याने त्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे केवळ नियमांचा बाऊ करून ऑनलाईन सभेचा अट्टाहास योग्य नसून सभा कोरूना नियमांचे पालन करून जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेणे शक्य असल्याची भूमिका जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त
No comments
Post a Comment