Breaking News

1/breakingnews/recent

25 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

        News24सह्याद्री - कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा

\



TOP HEADLINES


1. नवी मुंबई मनपा निवडणूक, वॉर्ड 7
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय चौगुले यांनी बाजी मारली होती. ही निवडणूक पॅनल पद्धतीने पार पडली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. 

2. निवडणुकांपूर्वी केंद्रीय सुरक्षा दल पश्चिम बंगालमध्ये दाखल
 पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय डावपेच वेगवान होत आहेत. येत्या काही महिन्यांत बंगाल पुन्हा एकदा नविन मुख्यमंत्री निवडेल. राज्यातील राजकीय गदारोळा दरम्यान केंद्रीय पोलिस दल बंगालमध्ये पाठविला जात आहे. 

3. मनसेचे धुळ्यात खळखट्याक.महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने धुळे शहरातील साक्री रोड भागात असलेल्या वाढीव वीज बिलप्रश्नी खळखट्याक आंदोलन केले. मनसेने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात वाढीव वीज बिल तसेच वीज कनेक्शन कट करणाऱ्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करण्यात आले. 

4. राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी
कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून तो थांबवण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तेथील स्थानिक प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील प्रवाशांना परभणी जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यता आली आहे. 

5. दीपिका लेव्हीज  ब्रँडची भारतातील पहिली महिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!
दीपिका पादुकोण आता लेव्हीज या ग्लोबल ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर झाली आहे. डेनिम ब्रँडच्या मते दीपिका ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानं ते नवीन पिढीतील महिलांना त्यांच्या ब्रँडकडे आकर्षित करू शकतील. 

6. राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार
 महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता. उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही.

7. कोल्हापुरात कोरोनाचा धोका वाढला, पुन्हा देऊळ बंद?
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंबाबाई मंदिर आणि जोतिबांच्या दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

8. ठाणे TMT जाहिरात घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या TMT मध्ये हा 27 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा घोटाळा संगनमत करून झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केला आहे. 

7. पोपनंतर बेन स्टोक्स आऊट, इंग्लंडला सहावा धक्का
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. या पहिल्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखलं आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 4 धक्के दिले आहेत. 

8. कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजयात, मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालघरच्या शार्दूल ठाकूरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळालेलं नाही. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *