News24सह्याद्री -अधिकाऱ्यांची एंट्री होताच वाळू तस्करांनी नदीपात्रातून धूम ठोकली..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. कामकाजात सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन - वसिम राजे
पारनेर शहरातील स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास मनसेच्या पध्दतीने १ मार्च रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांच्याशी चर्चा करताना दिला.
2. उर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच अंधार
एकतर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, कोरोना या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अत्यंत दैन्य अवस्था झाली आहे आणि परत वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण जोमात अन शेतकरी कोमात अशी अवस्था झाली आहे.
3. आमदार निलेश लंकेच्या मध्यस्तीने वीजपुरवठा होणार सुरळीत
जितेश सरडे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आवाहनानुसार वडझिरे,लोणीमावळा, देवीभोयरे,राधे,गारखिंडी,अळकुटी,कारखाना तसेच इतर गावातील सर्व शेतकरी बांधव वडझिरे सबस्टेशन वर मोठ्या संख्येने आले होते.
श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करी सुरु असलेल्या घटनास्थळावर अचानक प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक व तहसीलदार यांनी धाड टाकल्याने वाळू तस्कर चांगलेच गोंधळले .
5. अहमदनगर जिल्ह्यातील विशेष प्रस्तावास मान्यता
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत करण्याच्या कामांमध्ये नगर जिल्हा करिता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्य या कामाचा समावेश करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय कडून यास मान्यता देण्यात आली.
6. रक्तदान ही एक लोक चळवळ व्हावी - तहसीलदार अर्चना पागिरे
रक्तदान हा एक स्तुत्य उपक्रम असून रक्तदान ही एक लोक चळवळ व्हावी यासाठी लोक सहभाग महत्वाचा असून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन ही चळवळ बळकट करावी. असे प्रतिपादन शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले.
7. धोकादायक विद्युतवाहक तारी काढण्याची मागणी
शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील विष्णू अंकुश नजन यांची मौजे आखेगाव गावठाण येथे शेती आहे येथे जवळच महावितरणचा रोहित्र बसविण्यात आला आहे. दोन पोल मधिल अंतर 180 फूट असायला हवे होते मात्र ते तीनशे फूटाच्या आसपास आहे.
8. अहमदनगर जिल्ह्यास पहिला क्रमांक,दिल्लीत पुरस्कार प्रदान
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.
9. जुगाऱ्यांना दणका 1 लाखाच्या मुद्देमालासह चौघेजण ताब्यात
पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी वांबोरी येथील कुसमुडे वस्ती जवळ तिरट नावाचा जुगार खेळत असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून चारजणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे १लाख ३ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.
10. अंबरनाथ येथून चोरीला गेलेली बस नगर जिल्ह्यात सापडली
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून चोरीला गेलेली स्कूल बस शेवगाव उपविभागिय पोलिस अधिक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने शेवगाव येथे पकडली. पोलिसांचा सुगावा लागताच चोरटे बस सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.अंबरनाथ येथून स्कूलबस चोरीला गेल्याच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
No comments
Post a Comment