Breaking News

1/breakingnews/recent

11 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी करोना चाचणी बंधनकारक...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. अकोल्यात विनामास्क वाहनचालकांवर कारवाई
मनपा आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महसूल विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,अकोला तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार आत्राम, सिटी कोतवाली पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

२. पंढरपुरात पुन्हा रणधुमाळी
 दिवंगत आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरवातीला पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपुरात राजकीय बैठकांना वेग आला आहे.

३. CNG वर चालणारा  ट्रॅक्टर शुक्रवारी लाँच होणार
 केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे लाँचिंग पार पडणार आहे. मूळ डिझेलवर चालणारा ट्रॅक्टर सीएनजीमध्ये परावर्तित करण्याचे काम हे रामवत टेक्नो सोल्युशन आणि टॉसमेट्टो अचिल इंडिया यांनी संयुक्तरित्या केले आहे. 

४. गृहमंत्री अमित शाह यांचा टीएमसीवर जोरदार हल्ला
आज कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला.”बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आता पर्यंत १३० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.

५. केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी करोना चाचणी बंधनकारक
 कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. 

६. प्रवीण दरेकर यांची कोलापूरमध्ये पत्रकार परिषद
 आज राज्यातील भाजपा आंदोलक आंदोलनजिवी नाही का?, असा प्रश्न पत्रकारांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी कोल्हापुरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला. 

७. ऐतिहासिक भिडेवाडाचं रुपांतर स्मारकात होणार
 पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पाहिली शाळा सुरु केली. या वास्तुचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक अशी मागणी करण्यात आलीय. 

८. आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
 भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवले आहे. 

९. देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा
 पुण्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील विकास कामांच्या विविध प्रोजेक्टबाबत माहिती दिली. 

१०. वासिम जाफरवर गंभीर आरोप
टीम इंडियाचा माजी सलामीवीर वासिम जाफर  मोठ्या वादात सापडला आहे. वासिम जाफरने उत्तराखंड क्रिकेट संघाचं प्रशिक्षक म्हणून काम पाहताना, धर्म पाहून खेळाडूंची  नियुक्ती केल्याचा आरोप होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *