खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे
मुंबई -
उन्हाळ्याच्या दिवसाता शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. उन्हात मोठ्या प्रमाणात घाम येत असल्याने घामावाटे पाणी शरीराबाहेर फेकले जाते. त्यामुळेच शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. यावेळी भरपूर पाणी पिण्यासोबतच पाण्याचा अधिकांश असलेल्या फळांचे सेवन करणे आवश्यक असते. सध्याच्या घडीला बाजारात मोठ्या प्रमाणावात टरबूज पाहायला मिळतायत. या ऋतूत टरबूज खाणे शरीरासाठी हितकारक असते. टरबूजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. यामुळे डिहायड्रेशन रोखता येते. यात तब्बल ९५ टक्के पाणी असते. यासोबतच व्हिटामिन आणि मिनरल्सही असतात. हे खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. प्रत्येक मोसमात हे फळ खाल्ले पाहिजे असे डॉक्टरांचे म्हणणे असते.
१. खरबूज हे फळ सहसा जेवल्यानंतर खावे. कारण खरबुजामुळे जेवण उत्तमरीत्या पचते.
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे फायदे
२. खरबूज हे थंड असतं. या फळाच्या सेवनानं शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. खरबुजातील साखरेचं पचन सहज होऊन शरीराला ऊर्जा मिळते.
३. हे फळ उष्णतेचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
४. आम्लपित्त झाले असेल किंवा कायम होत असेल तर खरबूज भरपूर खावे.
५. खरबुजाच्या सालीचा उपयोग मूत्रावरोधामध्ये होतो. सालीसह खरबूज पाण्यात कुस्करून, गाळून ते पाणी रुग्णाने प्यायल्यास लघवी भरपूर व साफ होते.
६. खरबुजांच्या बियांमध्ये प्रथिने जीवनसत्त्वे व पौष्टिक घटक असतात. बियांमधून निघणारे तेल गोड व आहारामध्ये उपयुक्त असून पोषक व सारक असते.
७. या व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदा होतो.
८. यात अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन सी असते. व्हिटामिन सीमुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.
९. डायबिटीज लोकांसाठी टरबूज खाणे फायदेशीर असते. यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहते.
१०. शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी टरबूज खाल्ले पाहिजे. कॅन्सर सेल्स वाढण्यापासूनही टरबूज रोखते.
११. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर टरबूज खाल्ल्याने हा त्रास दूर होतो.
१२. तणाव, ब्लड प्रेशरसारख्या समस्यांमध्ये टरबूज खाणे फायदेशीर मानले जाते.
१३. सतत लघवीचा त्रास होत असेल टरबूज खाल्ल्याने फायदा होतो. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचन क्रिया सुरळीत होते.

No comments
Post a Comment