News24सह्याद्री- लॉकडाऊनचा 'बाहुबली' प्रभासला फटका, कंपनीवर कोटींचं कर्ज... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत
बॉलिवूड अभिनेता जॉन आब्राहम आगामी 'अटॅक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच एका अॅक्शन सीन दरम्यान तो जखमी झाला. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली आहे. जॉन अब्राहमने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. फोटोमध्ये जॉन अब्राहम शूटिंग दरम्यान ट्यूबलाइटचा अॅक्शन सीन करत होता आणि त्यावेळीच तो जखमी झाला आहे.
2. डार्लिंग्स चित्रपटात शाहरुख, आलिया भट्टसोबत काम करणार!
'डियर जिंदगी' चित्रपटानंतर शाहरुख खान आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा 'डार्लिंग्स' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. पण यावेळी शाहरुख खान चित्रपटामध्ये निर्माते म्हणून काम करत आहे. डार्लिंग्स चित्रपटामध्ये एका आई आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. जसमीत 'डार्लिंग्स' चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
3. रिंकु राजगुरुने शेअर केला नवीन व्हिडीओ,
रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.नुकताच रिंकूने नवीन व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे व्हिडीओमध्ये पाळीव कुत्र्यासोबत खेळताना ती दिसत आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. संपूर्ण देश तीन महिन्यांहून अधिक काळ बंद होता. या लॉकडाऊनच्या काळात भल्याभल्यांचं कंबरडं मोडलं. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. सिनेसृष्टीलाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास चंही मोठं नुकसान झालं आहे. प्रभासच्या प्रोडक्शन हाऊसला जवळपास हजार कोटींचा तोटा झाला आहे.
5. अभिनेता संदीप नाहरची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू
एम. एस. धोनी आणि केसरी चित्रपटातील अभिनेता संदीप नाहरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. मात्र संदीपने खरच आत्महत्या केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. मुंबईतील गोरेगाव येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये त्यानी स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
No comments
Post a Comment